स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर केईएममध्ये विलगीकरण कक्ष सुरू

By Admin | Published: July 1, 2017 03:15 AM2017-07-01T03:15:27+5:302017-07-01T03:15:27+5:30

परळ येथील केईएम रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात विशेषत: स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील.

On the grounds of swine flu, the merge cell is started in KEM | स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर केईएममध्ये विलगीकरण कक्ष सुरू

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर केईएममध्ये विलगीकरण कक्ष सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात विशेषत: स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी के.ई.एम. रुग्णालयास भेट दिली असता विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या रुग्णालयात अशा प्रकारचा कक्ष सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांकरिता विलगीकरण कक्ष आवश्यक असून, ज्या ठिकाणी असे कक्ष नाहीत तेथे तातडीने सुरू करण्यात यावेत, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
शंभरपेक्षा अधिक ताप, सर्दी-खोकला, घशाची खवखव अशी लक्षणे असतील तर अशा वेळेस डॉक्टरांनी एक दिवसाची वाट बघून रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यास त्याला ‘आॅसेलटॅमीवीर’ गोळी सुरू करावी. विशेष म्हणजे केंद्राच्या पथकाने याला सहमती दर्शविली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. वेगाने फैलावणाऱ्या स्वाइन फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांना भेटी देत आहेत. आतापर्यंत त्यांनी कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाला भेट देऊन टॅमीफ्लू गोळ्यांचा साठा, विलगीकरण कक्षाच्या सुविधा यांचा आढावा घेतला.
शुक्रवारी आरोग्यमंत्र्यांनी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील खासगी डॉक्टर व रुग्णालयांची बैठक घ्यावी. खासगी रुग्णालय व डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या आजाराचे लक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारा फलक लावावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गरोदर माता अशा गटाकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: On the grounds of swine flu, the merge cell is started in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.