ग्रुप बुकिंग फुल्ल
By admin | Published: July 24, 2014 01:40 AM2014-07-24T01:40:19+5:302014-07-24T01:40:19+5:30
एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणो कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी ग्रुप बुकिंग सेवा दिली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Next
मुंबई : एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणो कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी ग्रुप बुकिंग सेवा दिली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रुप बुकिंगसाठी आतार्पयत एसटीच्या 1 हजार 17 गाडय़ा फुल्ल झाल्या असून, अवघ्या 268 गाडय़ा ग्रुप आरक्षणासाठी उपलब्ध राहिल्या आहेत.
गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:यांना भक्तांना रेल्वेचे भाडे स्वस्त पडत असल्यामुळे कोकण रेल्वे गाडय़ांचे बुकिंग मोठय़ा प्रमाणात होते. यंदा मध्य रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या कोकणच्या गाडय़ांचे बुकिंग सुरू होताच ते दोन मिनिटांतच हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. तर सोडण्यात येणा:या विशेष गाडय़ाही फुल्ल झाल्या. रेल्वेबरोबरच गणोशोत्सवात एसटीनेही मोठय़ा प्रमाणात कोकणात जाणारा चाकरमानी आहे. गणोशोत्सवात लाखो चाकरमानी एसटी बससेवेचा आधार घेतात. यंदा एसटी महामंडळाकडून 1 हजार 895 ज्यादा गाडय़ा सोडण्यात आल्या असून, यामध्ये 1,285 ग्रुप बुकिंग आणि 610 नियमित बससेवांचा समावेश आहे. एसटी महामंडळाने 15 जुलैपासून ग्रुप बुकिंग सुरू केले होते. ही बुकिंग सुरू झाल्यानंतर 1,285 गाडय़ांपैकी आतार्पयत 1,17 गाडय़ा बुक झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले, तर 268 गाडय़ा ग्रुप आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. 26, 27 व 28 ऑगस्ट या तीन दिवसांतील ग्रुप बुकिंग मोठय़ा प्रमाणात असल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले. पालघर विभागातून महामंडळाच्या सर्वच्या सर्व गाडय़ा फुल्ल झाल्या आहेत. पालघर विभागातून 77 गाडय़ा घोषित केल्या होत्या. मात्र या विभागातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने तब्बल 79 एसटी बसचे ग्रुप बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. यात आणखी दोन बसची भर पडली
आहे. (प्रतिनिधी)
च्ठाणो विभागातून 418 ग्रुप बुकिंग
बस होत्या. या विभागातून 288 गाडय़ा बुक झाल्या आहेत.
च्24 जुलै रोजी 24 ऑगस्टचे नियमित आरक्षण सुरू होत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
एसटी बसची ग्रुप आरक्षण स्थिती पुढीलप्रमाणो
विभाग5 ऑगस्ट26 ऑगस्ट27 ऑगस्ट28 ऑगस्ट
मुंबई110747666
ठाणो15022116
पालघर--14587