जीएसटी विधेयकात चुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 04:19 AM2017-05-23T04:19:59+5:302017-05-23T04:19:59+5:30

वस्तू व सेवा कर विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असली तरी, विधेयकाच्या मुद्यातच अनेक चुका राहून गेल्या.

GST bill fails! | जीएसटी विधेयकात चुका!

जीएसटी विधेयकात चुका!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वस्तू व सेवा कर विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असली तरी, विधेयकाच्या मुद्यातच अनेक चुका राहून गेल्या. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही बाब लक्षात आणून दिली.
जीएसटी विधेयकातील ३६ कलमांमधील शेतजमीन भाडेपट्टीने देण्यासह, कूळ वहिवाटीच्या व्यवहारांवर जीएसटी लागू करणे, व्यापाऱ्यांची तपासणी, झडती, जप्ती व अटकेचे अधिकार करवसुली अधिकाऱ्यांना देणे आदी बाबींमध्ये संदिग्धता असल्याचे मुंडे यांनी निर्दनास आणून दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गंभीर दखल घेत वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरे शोधण्याचे तात्काळ आदेश दिले.

Web Title: GST bill fails!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.