GST: किमतीचे लावा नवीन स्टीकर, अन्यथा होणार कारवाई : वैधमापन शास्र विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:28 AM2017-11-17T02:28:58+5:302017-11-17T02:29:11+5:30

१७८ वस्तुंच्या जीएसटीत घट झाल्यानंतर त्या स्वस्त होणे अपेक्षित आहे. यासाठी विक्रेत्यांनी नवीन किमतीचे स्टिकर वस्तुवर लावावेत.

GST: Quote Prices New Sticker, Otherwise Action Taken: The Directorate of Valuation Issue | GST: किमतीचे लावा नवीन स्टीकर, अन्यथा होणार कारवाई : वैधमापन शास्र विभागाचे निर्देश

GST: किमतीचे लावा नवीन स्टीकर, अन्यथा होणार कारवाई : वैधमापन शास्र विभागाचे निर्देश

Next

मुंबई : १७८ वस्तुंच्या जीएसटीत घट झाल्यानंतर त्या स्वस्त होणे अपेक्षित आहे. यासाठी विक्रेत्यांनी नवीन किमतीचे स्टिकर वस्तुवर लावावेत. अन्यथा कडक कारवाईचे आदेश वैधमापन शास्र नियंत्रकांनी राज्यभरात दिले आहेत. या सोबतच ‘नफाखोर विरोधी’ मोहिम उघडण्याचे संकेतदेखील विभागाने दिले आहेत.
वैधमापन शास्र कायद्याअंतर्गत प्रत्येक डबाबंद वस्तुवर वजन व किंमतीची नोंद (मॅक्झिमम रिटेल प्राइज-एमआरपी) असणे बंधनकारक आहे. जीएसटी परिषदेच्या ९ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत १७८ वस्तुंवरील कर २८ वरून १८ व १२ वरून ५ टक्क्यांवर आणण्यात आले. त्यामुळे वस्तू स्वस्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरपूर्वी असलेल्या किमतीसोबतच करात घट झाल्यानंतरच्या किमतीचे नवीन स्टीकर विक्रेत्यांनी वस्तुवर लावावेत. ते लावले जात नसल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबईतील वैधमापन शास्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील सर्व विभागिय उप नियंत्रकांना दिले.
अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीलाही पत्र लिहिले आहे. कमी झालेल्या कराचा फायदा प्रत्यक्ष शेवटच्या ग्राहकाला देण्यासाठी चेम्बरने विक्रेत्यांना सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीएसटी कमी झालेल्या १७८ वस्तूंचा तब्बल ६ लाख कोटी रुपयांचा माल आज देशभरात बाजारात असल्याचे अ.भा. व्यापारी महासंघांच्या पाहणीत दिसून आले आहे.
इथे करा तक्रार-
छापील किमतीपेक्षा अधिक दराने किंवा जीएसटीनंतर कमी झालेल्या किमतीचे नवीन स्टिकर लावले गेले नसल्यास ग्राहकांच्या तक्रारीसाठी वैध मापनशास्र विभागाचे क्रमांक आहेत. 022-22886666या क्रमांकावर ग्राहक सकाळी १० ते सायंकाळी साडे पाचदरम्यान तक्रार करू शकतात. 98696 91666या क्रमांकावरदेखील तक्रार करता येईल.

Web Title: GST: Quote Prices New Sticker, Otherwise Action Taken: The Directorate of Valuation Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी