जीएसटीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम ?

By admin | Published: May 24, 2017 04:35 PM2017-05-24T16:35:11+5:302017-05-24T16:35:11+5:30

जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. नव्याने लागू होणाऱ्या जीएसटीमुळे पर्यटन व्यवसायात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

GST results in tourism business? | जीएसटीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम ?

जीएसटीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम ?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24-  जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. नव्याने लागू होणाऱ्या जीएसटीमुळे पर्यटन व्यवसायात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पर्यटनासाठी भारतात येणं जीएसटीमुळे पर्यटकांना महागात पडेल, असं बोलंल जातं आहे. पर्यटकांना भारतात हॉटेलमध्ये राहायला एका रूमसाठी पाच हजार रूपये मोजावे लागतात, यामध्ये 12 ते 18 टक्के कर आकारला जातो. पण हाच कर आता 28 टक्क्यांवर पोहचणार आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.  इतकंच नाही तर वातानुकूलित रेस्टॉरंट आणि बारमध्येसुद्धा 28 टक्के कर भरावा लागणार आहे. खरंतर पर्यटन व्यवसाय हा रोजगाराच्या बाबतित तीसऱ्या स्थानावर आहे.  भारतामध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हॉटेलमध्ये राहतो. एका पर्यटकाच्या मागे 28 लोकांना रोजगाराचं साधन मिळतं. म्हणुनच कराचा वाढता बोजा पर्यटन उद्योगाला घातक ठरू शकतो, असं जाणकार सांगत आहेत.  म्हणूनच रोजगारावरही जीएसटी प्रणालीचा परिणाम होईल, असं मत मांडलं जातं आहे. जीएसटीमध्ये समान करप्रणाली असल्यामुळे हॉटेलचे संचालकही आता चिंतेत आहेत. पंचतारांकीत हॉटेल, विला या सगळ्यांना समान कर असतील, हे अयोग्य आहे. असं हॉटेल मालकांचं म्हणणं आहे. 
जीएसटीमुळे भारतात पर्यटनामुळे येणारा पैसा दुसऱ्या देशांमध्ये जाऊ शकतो. तसंच भारतातील रोजगारावरसुद्धा याचा परिणार होईल.. हा टॅक्स कमी करण्याची मागणी हॉटेसचे मालक आणि टूर ऑपरेटर सरकारकडे करत आहेत. 

Web Title: GST results in tourism business?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.