मुंबईत मराठी माणूस बेघर होऊ न देण्याची ग्वाही

By Admin | Published: March 9, 2015 02:23 AM2015-03-09T02:23:02+5:302015-03-09T02:23:02+5:30

मुंबईच्या नवीन विकास आराखडा हा महापालिका प्रशासनाने तयार केला असून तो अंतिम नाही. या शहरातून मराठी माणसाला आम्ही कुठल्याही

Guaranteed not to make Marathi people homeless in Mumbai | मुंबईत मराठी माणूस बेघर होऊ न देण्याची ग्वाही

मुंबईत मराठी माणूस बेघर होऊ न देण्याची ग्वाही

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्या नवीन विकास आराखडा हा महापालिका प्रशासनाने तयार केला असून तो अंतिम नाही. या शहरातून मराठी माणसाला आम्ही कुठल्याही परिस्थितीत बेघर होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ते पत्र परिषदेत बोलत होते.
या विकास आराखड्याला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की भाजपाचाही काही मुद्यांना विरोध आहे. हा प्रशासनाने तयार केलेला आराखडा आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात येत आहेत. मग त्यावर महापालिका सभागृहात निर्णय होईल. नंतर राज्य शासनाची छाननी समिती त्यावर विचार करेल, नंतर राज्य शासन निर्णय घेईल.
मुंबईतील हरित पट्टे आणि खुल्या जागांचे संरक्षण केले जाईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Guaranteed not to make Marathi people homeless in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.