कंत्रटी कामगारांना पालकमंत्र्यांचा दिलासा

By admin | Published: August 5, 2014 12:11 AM2014-08-05T00:11:53+5:302014-08-05T00:11:53+5:30

वर्षानुवर्षे ठेकेदारांमार्फत महापालिकेच्या सेवेत काम करणा:या कंत्रटी कामगारांना पालकमंत्री गणोश नाईक यांनी आज मोठा दिलासा दिला आहे.

Guardian Minister to Contract Labor | कंत्रटी कामगारांना पालकमंत्र्यांचा दिलासा

कंत्रटी कामगारांना पालकमंत्र्यांचा दिलासा

Next
नवी मुंबई : वर्षानुवर्षे ठेकेदारांमार्फत महापालिकेच्या सेवेत काम करणा:या कंत्रटी कामगारांना पालकमंत्री गणोश नाईक यांनी आज मोठा दिलासा दिला आहे. या सर्व कामगारांना सेवेत कायम करून घेण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या 8 ऑगस्ट रोजी होणा:या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 
पालकमंत्री नाईक यांनी कंत्रटी कामगारांना नेहमीच सामाजिक न्याय प्रदान केला आहे. या कामगारांना समान कामास समान वेतन मिळवून दिले आहे. त्यांच्याच प्रयत्नाने या कामगारांना पीएफ, बोनस, ग्रॅच्युईटी आदींचा लाभ  मिळतो आहे. मात्र गेली अनेक वष्रे कार्यरत असूनही हे कामगार कायम झालेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर महापालिका सेवेतील कंत्रटी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री नाईक यांनी आज एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापालिका आयुक्त  आबासाहेब ज:हाड, महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्व कामागारांना सेवेत कायम करण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत आयुक्त व महापौरांना दिले. त्यानुसार येत्या 8 ऑगस्ट रोजी होणा:या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कंत्रटी कामागारांना दिलासा देणारा अशासकीय ठराव मांडण्यात येणार आहे. महापालिकेच्या विविध विभागात काम करणा:या 9500 कंत्रटी कामगारांना याचा लाभ होणार आहे.
विशेष म्हणजे  हा ठराव मंजूर होईर्पयत या कामगारांचा बेसिक पगार आणि भत्ते वाढविण्याची सूचना देखील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कंत्रटी कामगारांना कायम करण्याच्या पालिकेच्या ठरावास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी केली आहे. शासनाकडून ही मंजुरी न मिळाल्यास प्रसंगी कामगारहितास्तव राज्य शासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची भूमिका सुध्दा त्यांनी बोलून दाखविली आहे. 
कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्णय म्हणजे सामाजिक क्रांतीच असल्याचे मत नवी मुंबई म्युनिसिपल युनियनचे  कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
 
महापालिकेच्या सफाई खात्यात 286क्, पाणीपुरवठा खात्यात 45क्, मलनि:सारण खात्यात 238, परिवहन उपक्रमात 969, उद्यान विभाग 415 इत्यादी सर्व खात्यात मिळून कंत्रटी कामगारांचा आकडा सुमारे 95क्क् इतका आहे.  या कामगारांचा रोजगार वाचला पाहिजे यासाठी ठेकेदार बदलला तरी कामगार बदलता कामा नये हे पालकमंत्री नाईक यांचे कामगारहिताचे धोरण पालिकेने अवलंबले आहे. 
 
आम्हाला नोकरीत कायम करण्याचा निर्णय होणार असल्याचे ऐकून आनंद झाला आहे. पालकमंत्री गणोश नाईक यांनी नेहमीच सर्व सामान्य कामगारांचे हित जोपासले आहे. नामदार नाईक आम्हाला कायम करून न्याय देतील असा विश्वास असल्याचे मत नरेंद्र वैराळ या कामगाराने व्यक्त केले आहे.
 
पालकमंत्री गणोश नाईक यांच्या कल्याणकारी धोरणानुसार समान कामास समान वेतन देणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. आता कंत्रटी कामगारांना कायम करण्याचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंत्रटी पध्दतीचे समूळ उच्चाटन होणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून प्रशासनाने त्यावर तातडीने कार्यवाही करणो गरजेचे आहे. 
-अॅड. सुरेश ठाकूर, 
सरचिटणीस, नवी मुंबई म्युन्सिपल 
मजदूर युनियन 

 

Web Title: Guardian Minister to Contract Labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.