नक्षली हल्ल्यातील शहीदांना पालकमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली
By admin | Published: March 12, 2017 04:19 PM2017-03-12T16:19:35+5:302017-03-12T16:19:35+5:30
नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले प्रेमदास मेंढे आणि नंदकुमार आत्राम यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 12 - नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले प्रेमदास मेंढे आणि नंदकुमार आत्राम यांना आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पोलिस महानिरीक्षक राज कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक ए.पी. सिंग, कमांडंट मनोजकुमार ध्यानी, सेकंड कमांडंट सत्यप्रकाश, अतिरीक्त कमांडंट तोनसिंग, विभागीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शिरीश पांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहिली.
छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे बारा जवान शहीद झाले. त्यात पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हयातील प्रेमदास मेंढे, चंद्रपूर जिल्हयातील नंदकुमार आत्राम आणि भंडारा जिल्हयातील मंगेश बालपांडे यांचा समावेश असून मेंढे आणि आत्राम यांचे पार्थिव हेलीकॉप्टरने आज येथे आणण्यात आले. विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्थिवांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.