गुडन्युज ....! नवीन वीजजोडणीकरिता महावितरणची घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:44 PM2017-08-21T17:44:51+5:302017-08-21T17:46:06+5:30
सोलापूर दि २१ : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन आॅन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.
सोलापूर दि २१ : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन आॅन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.
नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निदेर्शानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.
नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील. त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीजजोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. यावेळी कर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचा प्रयत्न करतील.
नवीन वीजजोडणीसाठी इच्छूक असणाºया ग्राहकाला ओळखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन परवाना, फोटो पास (शासनमान्यताप्राप्त छायाचित्रित ओळखपत्र), खरेदी-विक्री कराराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळखपत्र यापैकी एक तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक कर पावती, सक्षम शासकीय अधिकारी यांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणत्र (अर्जदार भाडेकरू असल्यास), शासनाने दिलेले मालमत्ता कार्ड किंवा सात-बाराचा उतारा यापैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचाºयाकडे द्यावे लागणार आहे.
नवीन वीजजोडणीसाठी इच्छूक ग्राहकाने मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.