राज्यात अटकळबाजीला ऊत!
By admin | Published: October 17, 2014 03:00 AM2014-10-17T03:00:25+5:302014-10-17T11:00:29+5:30
विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल यंत्रबद्ध होताच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरून आता राजकीय अटकळबाजीला ऊत आला आहे.
Next
सगळेच दावेदार : राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही - खडसे : राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची - पटेल
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल यंत्रबद्ध होताच मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावरून आता राजकीय अटकळबाजीला ऊत आला आहे. एक्ङिाट पोलने वर्तविलेल्या भाकिताहून अधिक यश आम्हाला मिळणार आहे, त्यामुळे आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते करीत आहेत. तर याउलट, निकालानंतर सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केल्यामुळे चर्चेचे पेव फुटले आहे.
13व्या विधानसभेसाठी राज्यात बुधवारी (15 ऑक्टोबर) मतदान झाले. मतदान यंत्रत शेवटचे मत नोंदण्याअगोदरच विविध वाहिन्यांनी दाखविलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला. एक्ङिाट पोलचे निकाल येताच भाजपामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संभाव्य मंत्रिमंडळात कोण-कोण असेल, कोणाला कोणते खाते मिळेल, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. काहीनी तर मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तर याउलट परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत आहे. काँग्रेसचे नेते एक्ङिाट पोलवर बोलण्यास तयार नाहीत, तर हे अंदाज साफ चुकून आम्हाला किमान 6क् ते 7क् जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. भाजपाला 9क् ते 1क्क्च्या आसपास जागा मिळाल्या तर शिवसेनेची मदत घ्यावी लागेल. कारण दुस:या क्रमांकावरील जागा शिवसेनेला मिळतील, असा अंदाज आहे. जर भाजपाला 11क् ते 125 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल किंवा पाडली जाईल आणि एक गट भाजपाकडे येऊन पाठिंबा देईल, असा तर्क लढविला जात आहे. भाजपाला 13क् ते 14क् जागा मिळाल्या तर मनसे व अपक्ष यांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याकडे कल राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
च्ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या उमेदवारांसोबत सरकारबद्दलची नाराजी (अँटीइन्कम्बन्सी) त्यांना चिकटून राहिली. त्यामुळे असे किमान 7 ते 8 उमेदवार निवडून येणार नाहीत, अशी कबुली भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
च्खडसे म्हणाले की, दोन्ही काँग्रेसमधील काही लोकांना भाजपाने संधी दिली. मात्र त्यांना निवडणूक सोपी नाही हे प्रचारात जाणवले. काँग्रेसच्या सरकारमधील या लोकांनी पक्ष बदलला तरी अँटीइन्कम्बन्सी चिकटून राहिली. महागाई, लोडशेडिंग, भ्रष्टाचार याला हीच मंडळी जबाबदार असल्याचे त्यांच्या मतदारसंघातील लोक सांगत होते. त्याचा फटका अन्य पक्षातून आलेल्या काही उमेदवारांना बसणार आहे. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात चूक झालेली नाही. मतदारसंघात उमेदवार न देण्यापेक्षा उमेदवार देणो गरजेचे होते.
युती हे काय सात जन्माचे नाते होते का?
शिवसेना-भाजपा युती तुटल्याचा काहींना आनंद झाला तर काहींना दु:ख झाले. युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी अभिनंदनाचे दूरध्वनी केले, असे सांगून खडसे म्हणाले, युती तुटली म्हणजे काय, सात जन्माचे नाते होते का ते? आम्ही सात फेरे घेतले होते का? शिवसेना-भाजपामध्ये मोठा व लहान भाऊ कोण, हा प्रश्न 25 वर्षे सुटत नव्हता.
राष्ट्रवादी किंगमेकर ठरेल
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले जात असले, तरी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील.- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते
शिवसेना नकोच!
शिवसेनेबद्दल तीव्र नाराजी आहे. विशेषत: स्वत: उद्धव ठाकरे व ‘सामना’तून झालेल्या टीकेबद्दल कार्यकत्र्यामध्ये संताप आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊ नका, असे कार्यकत्र्याचे म्हणणो असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपामध्ये युतीवरून दोन प्रवाह
सरकार स्थापन करण्याकरिता काही आमदार कमी पडले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.