वसईच्या पायल दोशीने बनविला वैद्यकीय प्रवेशार्थीसाठी मार्गदर्शक अॅप PREXAM

By admin | Published: June 13, 2016 11:33 AM2016-06-13T11:33:50+5:302016-06-13T11:33:50+5:30

वसईच्या पायल दोशी या तरुणीने मंथन पुरस्कार प्राप्त सॉफ्टेक कंपनीतर्फे PREXAM हा अॅप खास ‘नीट’ च्या तयारीसाठी बनविला आहे

A guide app for medical admissions made by Payal Doshi of Vasai, PREXAM | वसईच्या पायल दोशीने बनविला वैद्यकीय प्रवेशार्थीसाठी मार्गदर्शक अॅप PREXAM

वसईच्या पायल दोशीने बनविला वैद्यकीय प्रवेशार्थीसाठी मार्गदर्शक अॅप PREXAM

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि, 13 - ‘नीट’ नाकारण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या राज्यसरकारांनी याचिका दाखल केल्या. पण सुप्रीम कोर्टाची नकारघंटा थांबत नाही. ‘नीट’ ची परीक्षा हाच एकमेव निकष ठरल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार नाहीत, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारास काही प्रमाणात लगाम बसेल हे जरी खरे असले तरीही अचानक उभ्या ठाकलेल्या हया परिक्षेने विद्यार्थ्यांची व पालकांची झोप उडवली आहे. थोडक्या कालावधीत ‘नीट’ ची तयारी कशी करावी हयाच विवंचनेत पालक व विद्यार्थी आहेत.
 
यासाठी PREXAM  हे गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे अॅप हे बरेच उपयोगी पडू शकते. वसईच्या पायल दोशी या तरुणीने मंथन पुरस्कार प्राप्त सॉफ्टेक कंपनीतर्फे PREXAM हा अॅप खास ‘नीट’ च्या तयारीसाठी बनविला आहे. हया अॅपमध्ये विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी १८००० प्रश्नांचा विशेष संच उभारण्यात आला आहे, त्याचा सराव विद्यार्थ्यांना करता येतो. २५ ते १०० मार्काच्या सराव परीक्षा हयात देता येतात. परीक्षेचे मुल्यमापन करून हा अॅप त्वरीत मार्क देतो. तसेच चुकीच्या उत्तरांची साठवण करून त्यावर ‘चुका दुरूस्ती परिक्षा’ देता येते. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी पडताळणी करून हा अॅप मार्गदर्शन करतो.  
 हा अॅप वापरण्यासाठी इंटरनेटची जरूरी नसते. ज्यामुळे कोठेही व केव्हाही मोबाइलवरून हा अॅप वापरता येतो. टॅब वरून अभ्यास करण्याचे तंत्रज्ञान सर्वपरिचित आहे. पण मोबाइलवरून अभ्यास ही संकल्पना नाविन्यपूर्ण असून तरुणांमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असल्याची माहिती मिळत आहे. हा अॅप ‘मंथन पुरस्कार – २०१४’ प्राप्त सॉफ्टेक कंपनीच्या पायल दोशी हया तरुणीने बनविला आहे. अधिक माहिती www.prexam.com हया संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: A guide app for medical admissions made by Payal Doshi of Vasai, PREXAM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.