सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘जाळरेषा’ मार्गदर्शक - राज्यपाल

By admin | Published: February 22, 2016 03:21 AM2016-02-22T03:21:04+5:302016-02-22T03:21:04+5:30

राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल

Guidelines for government officials 'governance' - Governor | सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘जाळरेषा’ मार्गदर्शक - राज्यपाल

सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘जाळरेषा’ मार्गदर्शक - राज्यपाल

Next


मुंबई : राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘जाळरेषा’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी, या पुस्तकाच्या लेखिका नीला सत्यनारायण, आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले की, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना नीला सत्यनारायण यांनी ‘सत्यं वद धर्मं चर’ या उक्तीप्रमाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी विशेषत: निवृत्त महिला अधिकाऱ्यांनी वाचण्यासारखे आहे.
महाराष्ट्राला आधुनिक आणि प्राचीन साहित्याची उत्कृष्ट परंपरा लाभली आहे. येथील लोक उत्तम पुस्तकांवर प्रेम करतात. नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या ‘जाळरेषा’ पुस्तकामुळे उत्तम पुस्तकांच्या यादीत भर पडली आहे. प्रशासनातील सर्व विभागांमध्ये, प्रशासकीय सेवेत त्याचबरोबर पोलीस सेवेतही अधिकाधिक महिलांचा समावेश आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, त्यांच्यामुळे प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास तसेच निर्णयप्रक्रियेत नक्कीच मदत होईल.
या वेळी श्रीमती नीला सत्यनारायण व नाना पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Guidelines for government officials 'governance' - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.