गुजरात विकासाचे मॉडेल फसवे-मुख्यमंत्री
By admin | Published: September 5, 2014 01:48 AM2014-09-05T01:48:31+5:302014-09-05T01:48:31+5:30
गुजरात विकासाचे मॉडेल हे केवळ फसवे आणि जाहिरातबाजीतून निर्माण केलेले आहे.
Next
नवी मुंबई : गुजरात विकासाचे मॉडेल हे केवळ फसवे आणि जाहिरातबाजीतून निर्माण केलेले आहे. त्यामुळे अशा जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणो गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले.
सिडकोच्या माध्यमातून वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एक्ङिाबिशन सेंटरचे आणि नेरूळ येथील प्रस्तावित पत्रकार भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना एकाच दिवशी झाली. असे असताना यापैकी कोणत्या राज्याची प्रगती झाली आणि कोणत्या नाही, हे ठरविण्याचे निकष काय आहेत, असा सवाल करून गुजरातच्या विकासाचा केवळ भास निर्माण केला गेला आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र अनेक पटीने प्रगतीशील असल्याचे ते म्हणाले.
राज्यात सध्या विजेची टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्राला होणारा कोळसा आणि गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे राज्यातील वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. खासगी वीज कंपन्यांनीही करार नाकारले आहेत. त्यामुळे राज्यात विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून देशातील अनेक राज्यांना या संकटातून जावे लागत आहे. अशा वेळी केंद्र शासनाने जबाबदारी घेऊन त्यावर तोडगा काढणो गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच एफएसआय आणि झोपडपट्टय़ांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना या दोन्ही प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असून यासंदर्भातील अध्यादेश येत्या एक दोन दिवसात जारी होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
अनियोजित बांधकामांमुळे नवी मुंबईतील गावे भकास झाली आहेत. या गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी क्लस्टर अर्थात समूह विकास योजना उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाण्यात ही योजना लागू केली आहे. मात्र नवी मुंबईतील प्रश्न वेगळे आहेत. येथील काही घटकांचा या योजनेला विरोध आहे.