संघाचा गुरूदक्षिणा निधी बेहिशोबी - दिग्विजय सिंग
By admin | Published: July 23, 2016 08:27 PM2016-07-23T20:27:32+5:302016-07-23T20:27:49+5:30
गुरुदक्षिणा म्हणून दर वर्षी जो निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गोळा केला जातो त्याचा कुठेच हिशेब ठेवला जात नसल्याचा आरोप यांनी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पणजी, दि. 23 - गुरुदक्षिणा म्हणून दर वर्षी जो निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गोळा केला जातो त्याचा कुठेच हिशेब ठेवला जात नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचीटणीस आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
संघाची अधिकृतपणे नोंदणीही झालेली नाही. संघ आणि संघ परिवाराकडून देशात शांती बिघडविण्याचे काम केले आहे. या संघटनेचाच हिस्सा असलेली गो रक्षा ही संघटना खंडणी गोळा करणारी संघटना आहे. गुजरातमधील दलितांवरील अत्याचारातून ते उघडही झाले आहे असे त्यांनी सांगितले.
काश्मीर मधील हिंसाचार हा दुर्दैवी आहे. मध्यंतरी अटलबिराहारी वाजपेयीच्या राजवटीत काश्मीर घाटीत शांतता प्रस्तापीत करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यासाठी कॉंग्रेसनेही सहकार्य केले होते. सध्याच्या भाजप सरकारच्या आणि कॉंग्रेसच्या काश्मीर विषयक भुमिकेत मूलभूत फरक आहेत. भाजपला काश्मिरींशिवाय काश्मीर भारतात हवा आहे तर कॉंग्रेसला काश्मीरींसह काश्मीर भारतात हवा आहे असे त्यांनी सांगितले.
महायुतीचा प्रस्तावच नाही, कॉंग्रेस ४० जागा लाढविणार
आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात महायुतीचा विषय सातत्याने चर्चिला जात असला तरी तसा कोणताही प्रस्ताव कॉंग्रेसला अद्याप आलेला नाही असे या पक्षाचे प्रभारी दिग्वीजय सिंग यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व ४० जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपला येत्या निवडणुकीत कॉंग्रेस पराभव चाखायला लावणार आहे. राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्यातही चांगले प्रशासन देण्यास भाजप सरकार असमर्थ ठरले आहे. त्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येणे चांगलेच आहे असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. महागठबंधनाच्या प्रस्तावाविषयी विचारले असता तसा प्रस्तावच नसल्याचे ते म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षाने कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याचेही आवाहन त्यांनी केले.
कॉंग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी महायुती न झाल्यास कॉंग्रेस सोडण्याच्या दिलेल्या धमकी विषयी विचारले असता त्यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास्त केल्याचे सांगून राणे यांच्याशी आपले बोलणे झाल्याचे ते म्हणाले. ८५ टक्के राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये आला असल्यामुळे या पक्षाच्या युती करण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. ऊर्वरीत १५ टक्के राष्ट्रवादीनेही कॉंग्रेस मध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले.
वेस्टन शिपयार्ड प्रकरण संसदेत उपस्थित करणार आणि केंद्रीय भूपृष्टवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी वेस्टनशिपर्याडच्या कर्मचा-यांना दिले. आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या वेस्टन शिपयार्डचे कामगार आणि क्रीडा खात्याच्या कर्मचाºयांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या बरोबर प्रदेशाध्यक्ष लुईझीन फालेरो, राष्ट्रीय सचीव चेल्ला कुमार व इतर नेते होते.