हेल्मेट वापरणाऱ्याना पोलिसांकडून 'गुलाब’

By Admin | Published: January 14, 2017 01:24 PM2017-01-14T13:24:04+5:302017-01-14T13:39:28+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. १४ -  हेल्मेट न वापरणा-यांना निबंध लिहिणे, मोफत भविष्य बघून त्याचे जाहीर वाचन करणे अशा प्रकारच्या ...

'Gulab' from police using helmet | हेल्मेट वापरणाऱ्याना पोलिसांकडून 'गुलाब’

हेल्मेट वापरणाऱ्याना पोलिसांकडून 'गुलाब’

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ -  हेल्मेट न वापरणा-यांना निबंध लिहिणे, मोफत भविष्य बघून त्याचे जाहीर वाचन करणे अशा प्रकारच्या शहर वाहतूक शाखेच्या गांधीगिरीला सामोरे जावे लागत होते, मात्र मकरसंक्रांती निमित्त हेल्मेट वापरणाऱ्या लोकांना गुलाबपुष्प देऊन संक्रांतच्या शुभेच्छा दिल्या. 'हेल्मेट असाच वापरा अन  आयुष्यावरील संक्रांत टाळा'  असा आवाहन केलं जात आहे.।
जे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करून दुचाकी चालवित आहे, त्यांना थांबवून वाहतूक पोलिसांकडून त्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदनही केले जात आहे. हेल्मेटधारकांचे अभिनंदन पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी करत असल्याने त्यांच्यासोबतचे छायाचित्र मोबाइलमध्ये क्लिक करून संबंधितांकडून ‘शिस्तप्रिय नाशिककर’च्या शीर्षकाखाली सोशल मीडियावरही पोस्ट केले जात असल्याचे दिसते
 

https://www.dailymotion.com/video/x844oa6

Web Title: 'Gulab' from police using helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.