गुलाबरावमहाराज यांचे पुण्यात स्मारक व्हावे

By admin | Published: April 17, 2015 12:52 AM2015-04-17T00:52:32+5:302015-04-17T00:52:32+5:30

साहित्य संमेलन घेण्यासाठी एकट्या गुलाबराव महाराजांचे साहित्य पुरेल, एवढी प्रचंड साहित्यनिर्मिती त्यांनी करून ठेवली.

Gulabrao Maharaj be remembered in Pune | गुलाबरावमहाराज यांचे पुण्यात स्मारक व्हावे

गुलाबरावमहाराज यांचे पुण्यात स्मारक व्हावे

Next

पुणे : ‘साहित्य संमेलन घेण्यासाठी एकट्या गुलाबराव महाराजांचे साहित्य पुरेल, एवढी प्रचंड साहित्यनिर्मिती त्यांनी करून ठेवली. त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांच्या विचारांवर चर्चा होणे आवश्यक आहे. पुण्यात महाराजांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
श्री संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. मोरे बोलत होते. भय्यूजी महाराज, पंडित वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, श्री संत गुलाबराव महाराज जीवनशताब्दी समितीचे कार्याध्यक्ष नारायण मोहोड, स्वागताध्यक्ष खासदार अनिल शिरोळे, डॉ. रंजना पत्की आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘संत गुलाबराव महाराज हे स्वतंत्र प्रज्ञा असणारे तत्त्वचिंतक होते. ज्या काळात ते महाराष्ट्रात होऊन गेले, तो महाराष्ट्रातील वैचारिक मंथनाचा रसरशीत काळ असल्याचे म्हणता येईल. एकाच वेळी अनेक शास्त्रांना भिडण्याची क्षमता असणारे महाराज म्हणजे एखाद्या चमत्कारासारखेच होते, असे त्यांनी सांगितले.
पत्की म्हणाल्या, ‘‘ज्यात अद्वैत वेदांत आहे, असे भक्तिशास्त्र गुलाबराव महाराजांनी मांडले. सेवाभाव, साधनाभाव, सख्यभाव असे भक्तीचे विविध भाव त्यांच्या साहित्यात दिसून येतात.’’ (प्रतिनिधी)

भाव आणि गुण एकत्र आले, की भक्तीचे आकलन
४भौतिकवाद आणि देववाद अशा दोघांच्या साहाय्याने मानवी अस्तित्वाचा खरा अर्थ उमगू शकतो. संत वाङ्मय या तत्त्वांचे दर्शन घडवते.
४भाव आणि गुण एकत्र आले की भक्तीचे आकलन होते. संत गुलाबरावमहाराजांचे साहित्य अशाच भक्तीचे दर्शन घडवीत असल्याचे भय्यूजी महाराज यांनी नमूद केले.

Web Title: Gulabrao Maharaj be remembered in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.