Gunaratna Sadavarte, Sharad Pawar Case: पवारांच्या घरावर आंदोलन केले, काय गुन्हा घडला ते सांगा; सदावर्तेंच्या वकिलांनी 'हे' मान्य केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:45 PM2022-04-11T16:45:23+5:302022-04-11T16:47:07+5:30

Gunaratna Sadavarte Case Hearing: आंदोलक गेले आणि त्यांनी गेटवर चप्पल फेकल्या आहेत. या आंदोलनात कोणीही जखमी झालेले नाही असा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी गिरीश कुलकर्णी यांनी केला आहे.

Gunaratna Sadavarte, Sharad Pawar Case: Agitation, tell what crime happened; Sadavarten's lawyers in Court Bail Hearing | Gunaratna Sadavarte, Sharad Pawar Case: पवारांच्या घरावर आंदोलन केले, काय गुन्हा घडला ते सांगा; सदावर्तेंच्या वकिलांनी 'हे' मान्य केले

Gunaratna Sadavarte, Sharad Pawar Case: पवारांच्या घरावर आंदोलन केले, काय गुन्हा घडला ते सांगा; सदावर्तेंच्या वकिलांनी 'हे' मान्य केले

Next

सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद संपल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणातील वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवादास सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांनी चुकीचे आरोप असल्याचा दावा, केला आहे. 

जे पैसे गोळा करण्यात आले त्याबाबत एका तरी कर्मचाऱ्याने तक्रार केली आहे का? ज्याफोन बाबत आणि सिमकार्ड बाबच पोलिस बोलत आहेत त्या सिम कार्डची वॅलिडिटी ३१ मार्च पर्यंत होती. म्हणून त्या दिवसापर्यंतच ते सिम आणि फोन वापरले गेले. प्रत्येकी ५३० रुपये गोळा केले, ते पैसे एसटी कर्मचाऱ्यांच्या कामासाठीच वापरले गेले. तशी पावती सर्वांना देण्यात आल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला आहे. 

पोलिसांना जर आधीच माहिती होती तर पोलिसांनी सुरुवातीलाच बंदोबस्त का लावला नाही, असा सवालही त्यांनी पत्रकारांना बोलविण्यात आल्याच्या मुद्द्यावर उपस्थित केला. आंदोलन केले, त्यात काय नुकसान झाले? त्या दिवशी कोणताच गुन्हा घडला नाही. कामगारांनी आपले आंदोलन केले, किरकोळ धक्काबुक्की झाली. फक्त सिल्व्हर ओकवर आंदोलन केले आणि चप्पल फेकली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. 

आंदोलक गेले आणि त्यांनी गेटवर चप्पल फेकल्या आहेत. या आंदोलनात कोणीही जखमी झालेले नाही. MJT च्या चंद्रकांत सुर्यवंशी याच्याशी फोनवर बोलणे झाले. ते मोर्चा बद्दल बोलणे झाले. तसेच अनेक पत्रकारांनी देखील फोन केला होता. नागपूर मधील एका व्यक्तीशी बोलणे झाले आहे, पण कोणाशी बोलणे झाले आहे हे शोधू शकले नाही असं कधी होतं का? असा सवालही केला आहे. 

तत्पूर्वी, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस कोर्टात गेले होते. सदावर्ते साहेबांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींग झाली होती. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूर मधून व्हॉटअॅप कॉल आला होता, त्यानंतर सारी जमवाजमव सुरु झाल्याचा दावा घरत यांनी केला आहे.

Web Title: Gunaratna Sadavarte, Sharad Pawar Case: Agitation, tell what crime happened; Sadavarten's lawyers in Court Bail Hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.