काशिमीरातून १४ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Published: March 11, 2015 02:09 AM2015-03-11T02:09:34+5:302015-03-11T02:09:34+5:30

गुजरातहून मुंबईत गुटखा घेऊन जाणारा टेम्पो उपअधिक्षक सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास पकडला.

Gurkha seized from Kashiriyar 14 lakhs | काशिमीरातून १४ लाखांचा गुटखा जप्त

काशिमीरातून १४ लाखांचा गुटखा जप्त

Next

भार्इंदर : गुजरातहून मुंबईत गुटखा घेऊन जाणारा टेम्पो उपअधिक्षक सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास पकडला. त्यातून सुमारे १४ लाख ४० हजारांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे़
राज्यात बंदी असलेला गुटखा मुंबईच्या दिशेने येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घोडबंदर मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल परिसरात सापळा लावला होता.
त्यावेळी तेथून शहरात जाणाऱ्या मार्गाजवळ ४०७ टेम्पो क्र. एमएच ०४ एफपी ८२५ संशयास्पदरित्या उभा असलेल्याचे पथकाला आढळले. त्यांनी त्याची झाडाझडती घेतली असता, त्यात विमल गुटखा व ए-वन तंबाखूच्या प्रत्येकी ४० गोणी आढळल्या. पथकाने हा मुद्देमाल काशिमिरा पोलिसांच्या ताब्यात देऊन टेम्पोसह गुटखा, तंबाखू जप्त केला. तसेच टेम्पो चालकाला ताब्यात घेतले.
मुद्देमालाची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरिक्षक माणिक जाधव यांना पाचारण केले असता त्यातील विमल गुटख्याची बाजारातील किंमत १२ लाख तर व ए-वन तंबाखूची किंमत २ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधीक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gurkha seized from Kashiriyar 14 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.