व-हाड्यांसोबतच गुरानांही गाव पंगत!

By admin | Published: March 19, 2017 02:19 AM2017-03-19T02:19:05+5:302017-03-19T02:19:05+5:30

शेतकर्‍याची भूतदया; परिसरात निर्माण केला आदर्श.

Gurnanhi village along with bone-bones | व-हाड्यांसोबतच गुरानांही गाव पंगत!

व-हाड्यांसोबतच गुरानांही गाव पंगत!

Next

अनिल गवई/
खामगाव, दि. १८- जीवेभावे शिव सेवा हा संत गजानन महाराजांचा मंत्र अंगीकारकरुन हिवरखेड येथील एका शेतकर्‍यांने मुलाच्या लग्नात वर्‍हाडी, गावकर्‍यांसह आणि गावातील गुरांनाही घास भरविला. पाचहजारावर नागरिकांसह गावातील १६00 गुरांना दिलेली ही अनोखी 'पंगत' परिसरात चर्चेत आली असून चारा टंचाईच्या काळात आगळी भूतदया जोपासली आहे.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील श्रीकृष्ण कांडेलकर शेतीसह गोपालनाचाही जोडधंदा करतात. त्यांच्या मुलगा जीवन याचा विवाह शनिवारी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यांनी हिवरखेड येथील समस्त नागरिकांना त्यांच्याकडील गुराढोरांसह मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. नवरदेव पारावर पोहोचण्यापूर्वीच गुरांसाठी एका शेतात तसेच गावालगत असलेल्या खुल्या जमिनीवर चार्‍याची व्यवस्था करण्यात आली. काही जनावरांना हिरवा चाराही देण्यात आला. तर दुभत्या जनावरांसाठी ढेप आणि इतर पशुखाद्याचा वापर करण्यात आला. त्यानंतर ग्रामदैवत श्री बिंद्रावन बाबांच्या मंदिरात श्रीकृष्ण त्र्यंबक कांडेलकर यांचा जीवन नामक मुलगा आणि मोताळा तालुक्यातील खरबडी येथील समाधान इंगळे यांची कन्या अश्‍विनी हिचा विवाह पार पडला. विवाह सोहळ्यानंतर लग्नासाठी उपस्थित असलेले वर्‍हाडी आणि गावकर्‍यांसाठी जेवणाची पंगत देण्यात आली.

नऊ ट्रॉली चार्‍याची व्यवस्था
गावातील सुमारे १६00 जनावरांसाठी नऊ ट्रॉली चार्‍याची व्यवस्था कांडेलकर यांच्याकडून गावठाणावर करण्यात आली होती. यामध्ये हिरव्या चार्‍यासह ढेपेचा समावेश होता.

Web Title: Gurnanhi village along with bone-bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.