गुरुदास कामत यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा
By Admin | Published: April 26, 2017 03:06 PM2017-04-26T15:06:48+5:302017-04-26T15:52:06+5:30
महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते गुरुदास कामत यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी दुपारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कामत यांच्या राजीनाम्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुदास कामत यांच्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरुन हटवल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
गुरुदास कामत यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरुन हटवून त्यांच्या जागी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने केलेल्या या फेरबदलावर कामत नाराज होते. गुजरातमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे.
काँग्रेससाठी सध्या देशात बुरेदिन सुरु आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गुजरात जिंकण्याचे काँग्रेसने लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी काँग्रेसने गुजरातमध्ये संघटनात्मक बांधणी भक्कम करण्यासाठी कामत यांना हटवून त्याजागी गेहलोत यांची नियुक्ती केली. गुरुदास कामत गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज होते.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्येही उमेदवार ठरवण्यावरुन त्यांचे तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबरोबर मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली होती. आज दिल्ली महापालिका निवडणूकीचे निकाल जाहीर झाले. इथेही पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला