‘गुरुजी’ हे आध्यात्मिक साधनेचा आविष्कार -मोहन भागवत
By admin | Published: December 2, 2014 04:27 AM2014-12-02T04:27:59+5:302014-12-02T04:27:59+5:30
पूज्यनीय गुरुजींचे जीवन त्यांच्या पुन:निर्मित वास्तूमध्ये अनुसरले गेले पाहिजे, तरच त्या वास्तूचे पुनर्निर्माण झाले असे म्हणता येईल
रामटेक (जि़नागपूर) : पूज्यनीय गुरुजींचे जीवन त्यांच्या पुन:निर्मित वास्तूमध्ये अनुसरले गेले पाहिजे, तरच त्या वास्तूचे पुनर्निर्माण झाले असे म्हणता येईल. गुरुजी हे आध्यात्मिक साधनेचा प्रायोगिक आविष्कार होते. ते प्रकांड पंडित व नम्र होते. त्यांना प्राप्त झालेली दृढता ही विवेकाने प्राप्त झाली होती, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या निवासस्थानाचे अर्थात ‘ताई भाऊजी गोळवलकर’ स्मृतिभवनचे भारतीय उत्कर्ष मंडळ व स्वयंसेवकांच्या सहकार्याने नुकतेच पुनर्निर्माण करण्यात आले. या स्मृतिभवनचे सोमवारी सायंकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण केले. रामटेक येथील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (प्रतिनिधी)