गुरुजी खूश! २,३२९ शिक्षकांची घराजवळ बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:29 AM2023-12-31T09:29:01+5:302023-12-31T09:29:37+5:30

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा विषय ‘लोकमत’ने सुरुवातीपासून लावून धरला आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत

Guruji is happy Transfer of 2,329 teachers near home | गुरुजी खूश! २,३२९ शिक्षकांची घराजवळ बदली

गुरुजी खूश! २,३२९ शिक्षकांची घराजवळ बदली

 मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील २,३२९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. घराजवळ बदली झाल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा विषय ‘लोकमत’ने सुरुवातीपासून लावून धरला आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. २१ जून २०२३ च्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात २४ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेने आंदोलन सुरू केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. 

जिल्हांतर्गत बदल्याही ऑनलाइन करा 
जिल्हांतर्गत बदल्यादेखील ऑनलाइन करुन भ्रष्टाचार थांबवावा. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीपूर्वी कार्यमुक्त करावे, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी केली आहे.

संघटनेची मागणी
२८ ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनांच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेने राज्यातील बदलीपात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने तत्काळ सुरू करावी, अशी मागणी केली होती.

बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण
मंत्री केसरकर यांनी तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते. त्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील २,३२९ प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात लवकरच हजर होतील. 
 

Web Title: Guruji is happy Transfer of 2,329 teachers near home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.