राज्यात आठ वर्षांच्या बंदी काळात अडीचशे कोटींचा गुटखा-पानमसाला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:56 PM2020-07-19T13:56:37+5:302020-07-19T14:00:55+5:30

बंदीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही, गुटखा-पानमसाल्याची अवैध निर्मिती आणि वाहतूक रोखण्यात प्रशासनाला अपयश

Gutkha-Panamsala worth Rs 250 crore seized from ban time in the state | राज्यात आठ वर्षांच्या बंदी काळात अडीचशे कोटींचा गुटखा-पानमसाला जप्त

राज्यात आठ वर्षांच्या बंदी काळात अडीचशे कोटींचा गुटखा-पानमसाला जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी तरी दरवर्षी अधिकाधिक गुटखा जप्तजवळपास सव्वासहा हजारांहून अधिक जणांवर खटलेही दाखल राज्य सरकारने जुलै २०१२-१३ मध्ये गुटखा आणि पानमसाल्यावर घातली बंदी

विशाल शिर्के 
पिंपरी : राज्यात गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही, गुटखा-पानमसाल्याची अवैध निर्मिती आणि वाहतूक रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) व पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. या काळामध्ये तब्बल २५६ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा राज्यभरातून जप्त केला आहे. जवळपास सव्वासहा हजारांहून अधिक जणांवर खटलेही दाखल झाले आहेत. 
 केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाने २७ ऑगस्ट २०१२ रोजी अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ची अंमलबजावणी करण्याची विनंती देशातील राज्य सरकारला केली होती. त्यानुसार राज्य सरकारने जुलै २०१२-१३ मध्ये गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली. गेल्या आठ वर्षांपासून राज्यात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी असली तरी, बंदी काळामध्ये दर वर्षी अधिकाधिक गुटखा जप्त केला जात आहे. 
बंदी घातलेल्या २०१२-१३ या वर्षी एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईत २० कोटी ७४ लाख रुपयांचा गुटखा आणि इतर पदार्थांचा साठा आढळला होता. तर, २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ५७ कोटी २८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुटख्याच्या अवैध उत्पादन युनिटदेखील एफडीएने उघडकीस आणले होते. त्याचबरोबर गुजरातमध्ये निर्माण झालेला आणि त्यावर ‘केवळ निर्यातीसाठी’ असा असलेला गुटखादेखील छाप्यामध्ये आढळून आला आहे. 
या धंद्याची पाळेमुळे खणून काढण्यात एफडीए आणि पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. सापडलेला गुटखा आणि पानमसाल्याचा साठा केवळ हिमनगाचे टोक असल्याचे सांगितले जात आहे. 
लॉकडाऊन काळात साडेतेरा कोटींचा गुटखा जप्त 
कोरोनाचा (कोविड-१९) प्रसार रोखण्यासाठी २४ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाले. या काळामध्ये राज्यभरात केलेल्या तपासणी तब्बल १३ कोटी ४६ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. 
च्गेल्या आठ वर्षांतील कारवाईत आढळलेल्या एकूण साठ्याच्या ५.२४ टक्के गुटखा-पानमसाला एप्रिल ते जून या तीन महिन्यांतच जप्त केला आहे. 
......
एफडीएची २०१२-१३ ते जून २०२० पर्यंतची कारवाई

तपासणी केलेल्या पेढ्यांची संख्या - 96,018

गुटखा-पानमसाला आढळलेल्या पेढ्या  - 10,237

एफआयआर दाखल पेढ्या  -5,757

एकूण दाखल खटले - 6,375
 

Web Title: Gutkha-Panamsala worth Rs 250 crore seized from ban time in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.