पंढरीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:47 AM2017-10-30T03:47:02+5:302017-10-30T03:47:33+5:30

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत, राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या दिंड्या ६५ एकर क्षेत्रामध्ये विसावत आहेत़

Gyanoba-Tukaram's alarm in the staircase! | पंढरीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर!

पंढरीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर!

Next

प्रभू पुजारी
पंढरपूर : टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत, राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या दिंड्या ६५ एकर क्षेत्रामध्ये विसावत आहेत़ मंगळवारी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने रविवारीपासूनच दिंड्या पंढरी नगरीत दाखल होऊ लागल्या आहेत.
कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर परिसरात प्रशासनाच्या वतीने ३७३ प्लॉट तयार करण्यात आले आहेत़ यामध्ये एकूण ३०० दिंड्यामधील सुमारे १ लाख ३५ हजार ते दीड लाख वारकºयांच्या निवासाची सोय करण्यात आल्याची माहिती मोहोळचे नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली़
वारीसाठी आलेल्या वारकºयांसाठी प्रशासनाच्या वतीने ६५ एकर क्षेत्रांमध्ये विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ यामध्ये पाणी, वीज, तात्पुरती फायबरची स्वच्छतागृहे, प्रशस्त रस्ते आदी सुविधा देण्यात आल्या आहेत़ वारकºयांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त आहे़ या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन सुविधा केंद्रही सुरू केले आहे़

Web Title: Gyanoba-Tukaram's alarm in the staircase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.