‘एचए’ कामगारांची दिवाळी अंधारात?

By admin | Published: October 19, 2016 01:45 AM2016-10-19T01:45:45+5:302016-10-19T01:45:45+5:30

(एचए) कंपनीतील कामगारांना मात्र गेल्या चोवीस महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

'HA' workers in Diwali dark? | ‘एचए’ कामगारांची दिवाळी अंधारात?

‘एचए’ कामगारांची दिवाळी अंधारात?

Next


पिंपरी : विविध कंपन्यांमध्ये दिवाळी बोनसवाटप सुरू असताना पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांना मात्र गेल्या चोवीस महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
दिवाळी जवळ येत आहे, तसे विविध कंपनीतील कामगारांना दिवाळीच्या बोनसचे वेध लागले आहेत. मात्र, ‘एचए’ कंपनीची स्थिती बिकट आहे. कंपनीकडे निधी नसल्याने गेल्या चोवीस महिन्यांपासून कामगारांना पगार मिळालेला नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या या कंपनीतील कामगारांपुढे पगाराचाच यक्षप्रश्न असल्याने बोनसबाबत तर त्यांच्या डोळ्यापुढे अंधारच आहे, अशी स्थिती आहे.
केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत १९५४मध्ये पिंपरी येथे एचए कंपनी स्थापन करण्यात आली. केंद्र सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील एचए ही पहिली औषध कंपनी असून, येथे प्रतिजैविक औषधे तयार केली जातात. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी २००७ला केंद्र सरकारने कंपनीला १४० कोटींचे पुनर्वसन पॅकेज दिले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही.
या कंपनीत अकराशे कामगार असून, त्यांना चोवीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारून कंपनी सुस्थितीत येईल, या अपेक्षेवर कामगार आहेत. (प्रतिनिधी)
>‘एचए’ कंपनीने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. पंजाब बँकेची थकबाकी १७६ कोटी ३० लाख ९७ हजार २९७ इतकी आहे. कंपनीच्या मालकीच्या महेशनगर येथील जमिनीवर पंजाब नॅशनल बँकेने प्रतीकात्मक ताबा घेतला आहे.
>कंपनीतील कामगारांना गेल्या चोवीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारायला हवी. पगार मिळत नसल्याने कामगारांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
- अरुण बोऱ्हाडे, उपाध्यक्ष, एचए, मजदूर संघटना

Web Title: 'HA' workers in Diwali dark?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.