जानेवारी महिन्यात गारपिटीची चिन्हे !

By admin | Published: December 9, 2014 02:15 AM2014-12-09T02:15:48+5:302014-12-09T02:15:48+5:30

येत्या जानेवारीत गारपीट होण्याची शक्यता असल्याचे भाकित ‘सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड स्पेस टेक्नॉलॉजी’चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले.

Hail Marks in January! | जानेवारी महिन्यात गारपिटीची चिन्हे !

जानेवारी महिन्यात गारपिटीची चिन्हे !

Next
राजीव मुळ्ये ल्ल सातारा
येत्या जानेवारीत गारपीट होण्याची शक्यता असल्याचे भाकित ‘सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड स्पेस टेक्नॉलॉजी’चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले. सूर्यबिंबावरील घडामोडींचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
खासगी कार्यक्रमासाठी साता:यात आलेले औंधकर ‘लोकमत’शी बोलत होते. जानेवारीत दुस:या व तिस:या आठवडय़ापासून राज्यात गारपीट होईल आणि त्या सुमारे महिनाभर चालतील, अशी शक्यता व्यक्त करून ते म्हणाले, ‘ध्रुवीय चक्रावाताचा हा परिणाम आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील डागांची संख्या वाढत जाण्याची व पुन्हा कमी होत जाण्याची प्रक्रिया सौरसाखळी या नावाने ओळखली जाते. ही साखळी सुमारे 11 वर्षाची असते. डागांची अत्युच्च संख्या सहा महिन्यांपूर्वीच गाठली गेली असून, आता ते कमी होत आहेत. हे डाग म्हणजे सूर्यावरील स्फोटांच्या खुणा होत.
हेलियम आणि हायड्रोजनचे अणुभंजन होऊन हे उत्सजर्न होते आणि ‘सौरवात’ (सोलर विंड) निर्माण होतो. हा एक प्रचंड झोत असतो आणि त्यात पूर्ण पृथ्वी न्हाऊन निघते. सौरवातांची संख्या जसजशी कमी होईल, तसतशी पृथ्वीला मिळणारी उष्णता कमी होत जाते आणि ध्रुवीय प्रदेशांपासून बर्फ वाढण्यास सुरुवात होते. या घडामोडींमुळेच गेल्या वर्षी ईशान्य अमेरिका बर्फाखाली गेली तर आपल्याकडे गारपीट झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्याकडे ज्याला ‘पश्चिम विक्षोप’ किंवा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ म्हणतात, ते मूलत: थंड वारे असतात. उत्तर ध्रुवावरून वाहणारे हे वारे वायव्य दिशेने अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे भारतात येतात. या चलनवलनाला ‘जेट स्टॉर्म’ असे म्हटले जाते. अमेरिका गोठण्याची प्रक्रिया व आपल्याकडील गारपीट यांचा घनिष्ट संबंध आहे, तो या घडामोडींमुळेच. 2क् नोव्हेंबरला 5क् टक्के अमेरिका बर्फाखाली गेली होती. त्यामुळेच जानेवारीत आपल्याकडे गारपीट होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
 
अशा या सौरसाखळ्या..
च्सूर्यावरील स्फोट आणि त्यामुळे तयार होणारे डाग वाढत जाण्याची आणि पुन्हा कमी होण्याची साखळी सुमारे 11 वर्षाची असते.
च्तेवीसावी सौरसाखळी 1996 ते 2क्क्7 या काळात झाली. या 11 वर्षात सूर्यावरील डागांची संख्या 17क् नोंदविली गेली. 
च्सध्या चोवीसावी सौरसाखळी सुरू असून, सूर्यावरील डागांची महत्तम संख्या 6 महिन्यांपूर्वी गाठली गेली आणि ती फक्त 7क् होती.  
च्बावीसाव्या साखळीत सौरडागांची संख्या 21क् होती. म्हणजेच सूर्यावरील उत्सजर्नाच्या घटनांचे प्रमाण प्रत्येक साखळीत कमी होत आहे.
च्सूर्यावरील उत्सजर्नामुळेच पृथ्वीला उष्णता मिळते आणि ती कमी होत असल्याने पृथ्वीवरील शीतवादळांच्या घटना वाढत आहेत.
 
अभ्यासाची पूर्वपीठिका
आयुका आणि नासा यांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे सूर्याचा व्यास मोजण्याच्या उपक्रमात श्रीनिवास औंधकर चार वर्षे सहभागी झाले होते. सूर्य मोठा होत आहे, असा निष्कर्ष या ‘टीम’ने काढला होता आणि या संशोधनाबद्दल 1993 मध्ये संसदेत औंधकर यांच्या अभिनंदनाचा ठरावही झाला होता. तेव्हापासूनच सूर्याच्या पृष्ठभागावरील घडामोडींचा अभ्यास ते अव्याहतपणो करीत आहेत.

 

Web Title: Hail Marks in January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.