दरडीवरील झोपड्या मृत्यूच्या छायाखाली!

By admin | Published: May 11, 2014 07:02 PM2014-05-11T19:02:44+5:302014-05-12T02:39:55+5:30

ऐन पावसाळ्यात मुंबईतील दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमुळे शेकडो निष्पाप जीवांचे बळी यापूर्वी गेले असतानाच येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासंबधी प्रशासनाने अद्याप काहीच हालचाल केलेली नाही.

Hail slope under the shadow of death! | दरडीवरील झोपड्या मृत्यूच्या छायाखाली!

दरडीवरील झोपड्या मृत्यूच्या छायाखाली!

Next

दरडीवरील झोपड्या मृत्यूच्या छायाखाली!
मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईतील दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमुळे शेकडो निष्पाप जीवांचे बळी यापूर्वी गेले असतानाच येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासंबधी प्रशासनाने अद्याप काहीच हालचाल केलेली नाही. महत्वाचे म्हणजे दोन वर्षांपासून यासंदर्भातील कृती आराखडा तयार करण्याबाबतही काहीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने मे महिन्याच्या उत्तरार्धातच याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी ओरड होत आहे.
पावसाळ्यात दरड कोसळून निष्पाप जीवांचे बळी जाऊ नयेत; म्हणून अशा धोकादायक अथवा अतिधोकादायक ठिकाणांवरील रहिवाशांना सर्तकता म्हणून स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. तसे ते मागील वर्षीही करण्यात आले. परंतू येथील रहिवाशांच्या पुनर्वसंबधी काहीच पाऊले अद्याप उचलण्यात आलेली नाहीत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरडीच्या भितीखाली असणार्‍या झोपडयांची संख्या २२ हजार ४८३ एवढी आहे. आणि सुमारे १.१५ लाख रहिवाशांच्या जीवाला या दरडींचा धोका आहे. मुंबई झोपडप˜ी सुधार मंडळानेच केलेल्या एका सर्वेक्षणांती ३२७ ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले होते. संरक्षण भिंतीद्वारे होणार्‍या झोपडयांची संख्या १० हजार ३८१ असून, ताबडतोब स्थलांतरित झोपडयांची संख्या ९६५७ एवढी आहे.
मुंबईतील २५ विधानसभा मतदार संघात ३२७ दरडीचे विभाग आहेत. महत्वाचे म्हणजे सुरक्षेची उपाययोजना म्हणून सरकारने दरडीलगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी १९९२ सालापासून तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनासंबधी अद्याप कृती आरखडा तयार करण्यात आलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. (प्रतिनिधी)
...................
डोंगर उतारावरील झोपडीधारकांंच्या पुनर्वसबंधीचा कृती अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वी नगरविकास खात्याला दिले होते. मात्र नगरविकास खात्याने अद्याप काहीच कार्यवाही केलेली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
...................
विभागधोकादायक ठिकाणे
मुंबई शहर ४९
मुंबई उपनगर२७८
...................
विभाग झोपडयांची संख्या
शहर ३९८६
पूर्व उपनगर ८११३
पश्चिम उपनगर७९३९
...................
दुर्घटना वर्षे आणि मृतांचा आकडा
वर्षे    मृत्यू
१९९३  १७
१९९६  ११
१९९७  ११
२०००  ७८
२००५ ७३
२००९  ११

Web Title: Hail slope under the shadow of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.