ओला, उबर चालक आंदोलन तीव्र करणार

By Admin | Published: March 11, 2017 01:15 AM2017-03-11T01:15:28+5:302017-03-11T01:15:28+5:30

मनमानी पद्धतीने कंपन्यांची सुरू असलेली दंडवसुली तसेच कंपन्यांकडून दिले जाणारे कमी उत्पन्न याविरोधात नाराज असणाऱ्या ओला, उबरच्या भागीदार चालकांनी

The hail, the Uber driver's movement will intensify | ओला, उबर चालक आंदोलन तीव्र करणार

ओला, उबर चालक आंदोलन तीव्र करणार

googlenewsNext

मुंबई : मनमानी पद्धतीने कंपन्यांची सुरू असलेली दंडवसुली तसेच कंपन्यांकडून दिले जाणारे कमी उत्पन्न याविरोधात नाराज असणाऱ्या ओला, उबरच्या भागीदार चालकांनी शुक्रवारी एक दिवसीय संप पुकारला होता. या संपाचा सर्वसामान्य मुंबईकरांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. ओला, उबरचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना मात्र त्याचा फटका बसला. आपल्या मागण्यांवर योग्य विचार न केल्यास २१ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा चालकांकडून देण्यात आला आहे. तर १४ मार्च रोजी धरणे आंदोलन केले जाईल.
व्यवसायाची हमी मिळावी, महिन्याला सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे आश्वासन कंपनीकडून दिले जात असतानाच अत्यंत कमी उत्पन्न दिले जाते. त्यामुळे सव्वा लाख रुपयेच उत्पन्न प्राप्त करून देणे, चालकांवर मनमानी पद्धतीने सुरू असलेली दंडवसुली बंद करणे आणि सध्याच्या चालकांना उत्पन्न मिळवून देण्याअगोदरच वाहनांची संख्या वाढवण्यावर देण्यात आलेला भर चुकीचे असून, ते बंद करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी शुक्रवारी मुंबईत ओला, उबरच्या कार्यालयांसमोर चालकांकडून धरणे आंदोलन करत एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. मुंबईत जवळपास १५ हजारपेक्षा जास्त चालक आणि वाहने आहेत. पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय संपात काही चालकांनीच सहभाग घेतला. आता १४ मार्चला आझाद मैदानात धरणे आंदोलन तर २१ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. आमच्या मागण्यांवर योग्य विचार न केलास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा टूरिस्ट चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The hail, the Uber driver's movement will intensify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.