राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:33 AM2022-01-07T06:33:50+5:302022-01-07T06:34:03+5:30

राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २१ अंश होते.

Hail warning for next four days in the state; It will rain in this area | राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाच्या उत्तरेकडील भागात पश्चिमी विक्षोभमुळे १० जानेवारीपर्यंत काही भागात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ९ जानेवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २१ अंश होते. मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले.

७ जानेवारी : नाशिक, नंदूरबार आणि धुळे, पालघर, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
८ जानेवारी : जळगाव, नंदूरबार, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत पाऊस पडले. 
९ जानेवारी : बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,जळगाव, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे पाऊस पडेल. 
१० जानेवारी : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जालना, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

Web Title: Hail warning for next four days in the state; It will rain in this area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.