'कावळे' म्हणून हिणवलेल्यांची सेनेत घरवापसी
By admin | Published: February 24, 2017 03:13 PM2017-02-24T15:13:56+5:302017-02-24T15:15:22+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची धुरा असताना जे पक्षाशी बंडखोरी करायचे त्यांना गद्दार ठरवले जायचे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची धुरा असताना जे पक्षाशी बंडखोरी करायचे त्यांना गद्दार ठरवले जायचे. उडून गेले ते कावळे अशी त्यांची हेटाळणी केली जायची. त्यांच्यासाठी शिवसेनेची दारे कायमची बंद व्हायची. पण अलीकडच्या काहीवर्षात शिवसेनाही इतर पक्षांसारखीच झाली आहे. सोडून गेलेल्या शिवसैनिकांना पक्षात प्रवेशच नाही तर, त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिल्याची अनेक उदहारणे आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीतही उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत काही जणांनी बंडखोरी करुन भाजपाची वाट धरली तर, काही अपक्ष लढले. ज्यांनी अशी बंडखोरी केली त्यांच्यावर शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे गद्दारीचा शिक्का मारला. पुन्हा पक्षात घेणार नाही अशा गर्जना झाल्या. पण महापालिकेची सत्ता दूर जाण्याची चिन्हे दिसताच निवडून आलेल्या अशा बंडोबांना चुचकारण्यास सुरुवात झाली आहे.
सेनेशी बंडखोरी करुन निवडून आलेल्या अपक्षांना पुन्हा सन्मानाने पक्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बंडखोरी केल्याने पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेले शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरे, स्नेहल मोरे आणि तुळशीदास शिंदे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे.