विदर्भात गारपीट, मराठवाड्यात अवकाळी!
By admin | Published: January 2, 2015 01:21 AM2015-01-02T01:21:26+5:302015-01-02T01:21:26+5:30
राज्याच्या बहुतांश भागाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला़ विदर्भात गारपीट, तर मराठवाड्यात बुधवारी रात्री व गुरुवारी अवकाळी पाऊस झाला़
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला़ विदर्भात गारपीट, तर मराठवाड्यात बुधवारी रात्री व गुरुवारी अवकाळी पाऊस झाला़ बेमोसमी पावसाने आंबा, द्राक्ष, डाळिंबांसह केळी,गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मुंबईतही ढगाळ वातावरण होते.
अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह््यात बुधवारी रात्री झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे अकोलासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. बुलडाणा जिल्'ातील संग्रामपूर, नांदूरासह बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, इरला परिसरात गारपीट झाली़ दुपारी ४ वाजता बुलडाणा शहर धुक्यामध्ये हरवले होते़ तर वाशिम जिल्'ात सरासरी ७.१७ पावसाची नोंद झालीआहे.
यवतमाळ जिल्'ातील उमरखेड आणि अमरावतीत अचलपूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीने गहू, हरभरा आणि केळी पिकाचे नुकसान झाले असून दुपारपर्यंत अनेक तालुक्यांत रिमझिम सुरू होती. धुळेजिल्'ात बुधवारी रात्री झालेल्या रिपरिपीमुळे गहू आणि हरभरा पिकांना धोका निर्माण झाला आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्'ात गुरुवारी जोरदार पाऊस झाला़ कोल्हापूर जिल्'ात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तर सातारा जिल्'ात पावसाचा शिडकावा झाला.
औरंगाबादसह कन्नड, फुलंब्री, सोयगाव खुलताबाद तालुका परिससरात पाऊस झाला़ जालना जिल्'ातही सरी कोसळल्या.लातूर जिल्'ातील बहुतांश भागात अवकाळी, तर काही भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला़
बीडमध्ये १.७७ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्'ात झालेल्या पावसाने खरीप हंगामातील कापूस काळा पडला आहे़ त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच ऊस तोडणीवरही परिणाम दिसून आला़ परभणी जिल्'ातही या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़
हिंगोलीत गुरूवारी दिवसभर रिपरिप सुरू होती.
सेनगाव तालुक्यातील खुडज परिसरात पिके आडवी झाली. माळहिवरा
येथे दहा ते पंधरा मिनिटे गारपीट झाली. उस्मानाबादसह
कळंब, तुळजापूर, लोहारा, भूम तालुक्यात अवकाळी पाऊस झाला़ तर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परिसरातील जवळपास ६०० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!
च्पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन तो आता उत्तर आंध्रप्रदेश -दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर सरकला आहे़ परिणामी महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला़ पुढील ४८ तासांत मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़
सोलापूर : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या तडाख्याने डाळिंब, द्राक्षे, बोर, शेवगा या बागासह हुरड्यात आलेली ज्वारी, शेतात पडलेल्या कांद्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या आंब्याचा मोहोर गळून पडला आहे़ द्राक्षांच्या बागाही आडव्या झाल्या आहेत़