हज यात्रेकरूंना मिळाली मुदतवाढ
By admin | Published: April 25, 2016 05:26 AM2016-04-25T05:26:24+5:302016-04-25T05:26:24+5:30
मुस्लीम बांधवांना पासपोर्ट वैद्यकीय प्रमाणपत्र व आगाऊ ८१ हजार रुपये भरण्यासाठीची मुदत केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाने एक आठवड्याने वाढविली आहे.
मुंबई : यंदा हज यात्रेत जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना पासपोर्ट वैद्यकीय प्रमाणपत्र व आगाऊ ८१ हजार रुपये भरण्यासाठीची मुदत केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाने एक आठवड्याने वाढविली आहे. कमिटीच्या संकेतस्थळावर आॅनलाइन किंवा एसबीआय/युबीआय बॅँकेच्या खात्यावर आता ३० एप्रिलपर्यंत ही रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी पहिल्यांदा २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, यात्रेकरूंना थोडी सवलत मिळावी, यासाठी त्यासाठीचा कालावधी एक आठवड्याने वाढविण्यात आल्याचे हज कमिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खालिद अरब यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत असेल.