राज्यातील हज यात्रेकरू सुरक्षित

By admin | Published: September 13, 2015 02:35 AM2015-09-13T02:35:43+5:302015-09-13T02:35:43+5:30

आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेची संधी मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येक भाविकांची असते. यंदा महाराष्ट्रातून ८ हजार १०० यात्रेकरू जाणार आहेत. त्यातील ५ हजार ५०० सौदी

Haj pilgrims safe in the state | राज्यातील हज यात्रेकरू सुरक्षित

राज्यातील हज यात्रेकरू सुरक्षित

Next

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेची संधी मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येक भाविकांची असते. यंदा महाराष्ट्रातून ८ हजार १०० यात्रेकरू जाणार आहेत. त्यातील ५ हजार ५०० सौदी अरेबियात दाखलही झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी मक्का येथील मशिदीतील क्रेन दुर्घटनेनंतर राज्यातील यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती हज कमिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महाराष्ट्रात औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई येथून विमानाद्वारे थेट हज यात्रेकरू जातात. औरंगाबादहून २३८३, नागपूर येथून १८०० पेक्षा अधिक यात्रेकरू रवाना झाले आहेत. शुक्रवारपासून मुंबईहून यात्रेकरू जाण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईहून ४ हजार ४०० यात्रेकरू जाणार आहेत. १७ सप्टेंबरपर्यंत यात्रेकरू जाण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे केंद्रीय हज कमिटीने नमूद केले.
‘लोकमत’शी बोलताना केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खालेद अरब यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी मक्का येथील घटनेनंतर आम्ही सतत सौदी अरेबियाच्या दूतावासाशी संपर्क ठेवून आहोत. भारतातील ९ यात्रेकरू जखमी असल्याची माहिती समोर येत असून, मुंबईतील दोन यात्रेकरू जखमी असल्याची प्राथमिक माहिती येत आहे.

रात्रभर संपर्क : शुक्रवारी सायंकाळी मक्का येथील मशिदीमधील दुर्घटनेची माहिती रात्री १० वाजेच्या सुमारास महाराष्ट्रात धडकली. त्यानंतर नातेवाईकांनी आपल्या यात्रेकरूंना दूरध्वनी लावण्यास सुरुवात केली. सर्व नातेवाईक अत्यंत चिंतामग्न होते. रात्री उशिरा १ वाजेनंतर अनेकांचे यात्रेकरूंशी बोलणे झाल्यावर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अनेक यात्रेकरूंनी रात्री उशिरा नातेवाईकांना फोन करून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. बहुतांश यात्रेकरू दुर्घटना झाली तेव्हा आपापल्या खोलीतच होते.

जुन्या आठवणींना उजाळा
२ जुलै १९९० : चेंगराचेंगरीत १४२६ यात्रेकरूंचा मृत्यू
२३ मे १९९४ : सैतानाला दगड मारताना चेंगराचेंगरी, २७० ठार
९ एप्रिल १९९८ : ‘जमरात’च्या टेकडीवर चेंगराचेंगरी होऊन
११८ भाविकांचा मृत्यू
११ फेबु्रवारी २००३ : सैतानाला दगड मारताना
१४ भाविक मृत्युमुखी
१ फेबु्रवारी २००४ : सैतानाला दगड मारताना चेंगराचेंगरी होऊन
२५१ भाविकांचा मृत्यू
१२ जानेवारी २००६ : चेंगराचेंगरीत पुन्हा ३४० भाविकांचा मृत्यू

Web Title: Haj pilgrims safe in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.