हाजी अली प्रवेशवाद : तृप्ती देसाई परिसरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 05:14 PM2016-04-28T17:14:50+5:302016-04-28T17:31:53+5:30
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर व कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलन सुरु केले असून.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ : शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर व कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलन सुरु केले असून. दर्गा परिसरात त्या दाखल झाल्या आहेत. दर्गा परिसरात कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. हाजी अली दर्ग्यात महिला प्रवेशासाठी 'हाजी अली सब के लिए' फोरमची दर्ग्याबाहेर निदर्शने केली आहेत.
विरोध केला तरी मागे हटणार नाही. हाजी अली दर्ग्यात महिला प्रवेश प्रकरणी आमचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने असेल असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे. तर माध्यमांना दर्ग्यात प्रवेश नाकारला आहे. मीडियाचे येथे काय काम? आम्ही कुणाचीही दादागिरी चालवून घेणार नाही, अशी भुमीका हाजी अली ट्रस्टच्या विश्वस्तांनी घेतली आहे.
इथे महिलांना प्रवेश आहे. मात्र तृप्ती देसाई यांनी प्रवेश केल्यास साम-दाम-दंड अशा कोणत्याही मार्गाने विरोध करू, असा धमकीवजा इशारा इराज यांनी दिला आहे.
दरम्यान, तृप्ती देसाई यांना एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हायकार्टाच्या निर्णयाचे पालन केले जावे. महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळालाच पाहिजे. महिलांना दर्ग्यात प्रवेश मिळावा याबाबत राज्य सरकारची भुमीका स्पष्ट आहे. असे खडसे म्हणाले.