हाजी अली मुद्यावर हाजी अराफत शेख यांची भुमिका वैयक्तिक - निलम गो-हे

By admin | Published: April 23, 2016 05:35 PM2016-04-23T17:35:28+5:302016-04-23T17:35:28+5:30

हाजी अली दर्ग्यात महिलांनी प्रवेश करण्यावरुन हाजी अराफत शेख यांनी घेतलेली भुमिका त्यांची वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे

Haji Arafat Shaikh's role playing on Haji Ali issue - Neil Go-He | हाजी अली मुद्यावर हाजी अराफत शेख यांची भुमिका वैयक्तिक - निलम गो-हे

हाजी अली मुद्यावर हाजी अराफत शेख यांची भुमिका वैयक्तिक - निलम गो-हे

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २३ - हाजी अली दर्ग्यात महिलांनी प्रवेश करण्यावरुन हाजी अराफत शेख यांनी घेतलेली भुमिका त्यांची वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांनी प्रवेश केल्यास त्यांना चपलेने मारण्यात येईल असे पत्रक शिवसेना उपनेता हाजी अराफत शेख यांनी प्रसिद्ध केले होते.
 
हाजी अराफत शेख यांची वैयक्तिक भूमिका असून शिवसेना पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. मंदीर असो किंवा दर्गा, मशीद महिला पुरूष व  सर्वांनाच  समान अधिकार असावेत. पुरूषांना सर्व  धार्मिक स्थळांमध्ये जे अधिकार आहेत ते सर्व स्रियांनाही असावेत ही शिवसेनेची भूमिका आहे. तसेच न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी सरकार व पोलिसांनी करायलाच हवी, ही वस्तुस्थिती आहे व सरकारकडून याच पालनाची अपेक्षा आहे. म्हणूनच महिलांच्या धार्मिक स्थळातील प्रवेशास कोणत्याही प्रकारे विरोध करणे योग्य नाही.हाजी अराफत शेख यांची मत हे  पक्षाचे अधिकृत मत नाही याची समज त्यांनाही पक्षाने दिलेली आहे, अशी भूमिका  शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केली आहे.
 

Web Title: Haji Arafat Shaikh's role playing on Haji Ali issue - Neil Go-He

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.