डोंबिवलीत पगाराएवढा फेरीवाल्याला द्यावा लागतो हफ्ता, सेना नगरसेवकाकडून रेटकार्ड जाहीर
By admin | Published: June 12, 2017 10:14 PM2017-06-12T22:14:50+5:302017-06-12T22:14:50+5:30
शिवसेना उपोषणाला बसली आहे. तसेच शिवसेनेनं फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर करून टाकलंय.
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून केडीएमसीत फेरीवाल्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढला आहे. त्यात जास्त करून डोंबिवलीत फेरीवाला आणि पालिका यांची अभद्र युती झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अधिका-यांचं पाठबळ असल्यानं फेरीवाल्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलनं करूनही फेरीवाले निर्ढावलेले आहेत. त्यामुळे आता चक्क शिवसेना उपोषणाला बसली आहे. तसेच शिवसेनेनं फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर करून टाकलंय.अधिका-यांचं पाठबळ असल्यानं फेरीवाल्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलनं करूनही फेरीवाले बिनधास्त आहेत. त्यामुळे आता चक्क शिवसेना उपोषणाला बसला आहे. तसेच शिवसेनेनं फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर करून टाकलंय.
केडीएमसीत शिवसेना सत्ताधारी असतानाही त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. शिवसेनेकडून अनेक आंदोलनं करूनही फेरीवाल्यांना काही हटायला तयार नाहीत. त्यामुळे अखेर शिवसेनेवर उपोषण करण्याची नामुश्की ओढावली आहे. शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आम्ही सत्ताधारी असूनही प्रशासन कारवाई करत नसल्याची खंत म्हात्रे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी थेट पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी किती हप्ते घेतात, याचं रेटकार्डच जाहीर करून टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
फेरीवाल्यांकडून मिळणाऱ्या हफ्त्यांचे रेटकार्ड
महापालिका मुख्यालयासमोर - 30 हजार रुपये प्रति महिना
मधुबन टॉकीज फुटपाथ - 15 हजार रुपये आठवड्याला
रामनगरपर्यंत रात रोड - 17 हजार रुपये आठवड्याला
रामनगर आरटीओसमोर - 20 हजार रुपये प्रति महिना
केळकर रोड आणि शिवमंदिर - 10 हजार रुपये आठवड्याला
फुलवाले - 1 हजार 500 रुपये,
कपडेवाले - 2 हजार रुपये,
दाबेलीवाला - 3 हजार रुपये,
फरसाण - 3 हजार रुपये,
चायनीज - 3 हजार रुपये,
पाणीपुरीवाला - 2 हजार रुपये,
सरबतवाला - 4 हजार,
चहा आणि ताकवाला - 4 हजार रुपये,
चप्पलवाला - 5 हजार रुपये ( महिन्याला)