पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं

By Admin | Published: April 19, 2017 11:08 AM2017-04-19T11:08:40+5:302017-04-19T11:11:17+5:30

पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Half of the glass of water was not shared so that it was knocked out five times | पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं

पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - पाणी म्हणजे जीवन असं म्हणतात. पण याच पाण्यामुळे एका व्यक्तीवर आपला जीव गमावण्याची वेळ आली. पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथे एका हॉटेलबाहेर ही घटना घडली. पीडित व्यक्तीला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी अफरोज खान (37) याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री 10.30 वाजता वांद्रे येथील वरोडा रोडवर ही घटना घडली. पीडित व्यक्ती ग्लासने पाणी पित असताना अफरोज खान तिथे पोहोचला, आणि ग्लासमधील अर्ध पाणी पिण्यासाठी मागू लागला. पीडित व्यक्ती अफरोजला ओळखत नसल्याने त्याने सरळ नकार दिला. मात्र त्याने उद्धटपणे दिलेला नकार अफरोज खानच्या संतापाचं कारण ठरलं. त्याने हॉटेलच्या आत जाऊन चाकू बाहेर आणला आणि सरळ हल्ला करण्यास सुरुवात केली. अफोरजने पाच वेळा चाकूने वार केले, ज्यामध्ये पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत". 
 
पोलिसांनी कलम 326 अंतर्गत (धोकादायक शस्त्र किंवा साधनाच्या माध्यमातून स्वच्छेने गंभीर जखम पोहोचवणे) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अफरोज खान बेघर असल्याने त्याला शोधणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. मात्र पोलिसांनी खब-यांच्या सहाय्याने अफरोजचा शोध लावून त्याला अटक केली आहे. 
 

Web Title: Half of the glass of water was not shared so that it was knocked out five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.