राज्यातील वीज निर्मिती निम्म्यावर, अनेक संच बंद पडल्याने निर्मिती ३२४० मेगावॅटवर

By admin | Published: July 16, 2016 07:20 PM2016-07-16T19:20:08+5:302016-07-16T19:20:08+5:30

ओला कोळसा आणि उत्पादन खर्चावर आधारित किंमतीनुसार संचातून न होणारी विद्युत निर्मिती यामुळे राज्यातील महानिर्मीतीच्या वीज केंद्रातून होणारी निर्मिती निम्याहूनही घटली आहे

Half of the power generation in the state, due to the closure of several sets, created 3240 MW | राज्यातील वीज निर्मिती निम्म्यावर, अनेक संच बंद पडल्याने निर्मिती ३२४० मेगावॅटवर

राज्यातील वीज निर्मिती निम्म्यावर, अनेक संच बंद पडल्याने निर्मिती ३२४० मेगावॅटवर

Next
>गोपालकृष्ण मांडवकरल्ल / ऑनलाइन लोकमत - 
चंद्रपूर, दि. 16 - ओला कोळसा आणि उत्पादन खर्चावर आधारित किंमतीनुसार संचातून न होणारी विद्युत निर्मिती यामुळे राज्यातील महानिर्मीतीच्या वीज केंद्रातून होणारी निर्मिती निम्याहूनही घटली आहे. राज्यात असलेल्या महानिर्मितीच्या सात केंद्रातून ८,७२० मेगावॅट वीज निर्मिती होणे अपेक्षित असताना हे उत्पादन ३, २४० मेगावॅटवर उतरले आहे.
 
राज्यात चंद्रपूर, परळी, भुसावळ, नाशिक, खापरखेडा, पारस आणि कोराडी या सात ठिकाणी महाऔष्णिक वीज केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी मिळून ३१ संच असले तरी फक्त १२ संचच सुरू असून १९ संच बंद पडले आहेत. परळी येथील संच पाण्याअभावी बंद आहे, तर भुसावळ येथील संच उत्पादन खर्च वाढल्याने आठवडाभरापासून बंद आहे. यामुळे येथील उत्पादन पूर्णत: ठप्प आहे.
 
उत्पादन खालावण्यामागे ओला कोळसा असणे आणि प्रत्येक विद्युत केंद्रला ई.एम.आय.सी.द्वारे दर महिन्याला मेरिट ऑर्डर डिस्पॅचनुसार ठरवून दिलेल्या जनरेशन कास्टनुसार (उत्पादन खर्चावर आधारित किंमतीनुसार) उत्पादन न होणे ही या मागची कारणे सांगितली जात आहेत. असे असले ती चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उत्पादन ओल्या कोळशामुळे खालावल्याचे कारण येथील व्यवस्थापनाने नाकारले आहे. चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रात आठ संच असले तरी दोन संच प्रदुषणाच्या कारणावरून बंद करण्यात आले आहेत. उवारित सहा संचातून सध्या विज निर्मिती सुरू आहे. परळीचे केंद्र पाण्याअभावी बंद आहे, सोबतच भुसावळचेही केंद्र मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांहून होणारे उत्पादन शून्य आहे.
 
नाशिक वीज केंद्रातील एक संच बंद असून दोन संचातून ३०३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. खापरखेडातील पाच पैकी चार संच बंद असून केवळ एका संचातून ३८२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. कोराडीतील चारपैकी तीन संच बंद आहेत. तर, पारसचे दोन्ही संच सुरू आहेत. या अवस्थेमुळे राज्यातील महाऔष्णिक केंद्रातील उत्पादन अपेक्षेपेक्षा निम्म्यावर घटले आहे. त्याचा फटका उद्योगांना आणि ग्राहकांना बसायला लागला आहे.
 
उत्पादान खर्चाला राज्य वीज नियामक आयोगाची मर्यादा
ग्राहकांवर वीजेच्या दरवाढीचा नाहक बोझा पडू नये आणि अल्पदराने वीज विकण्याची पाळी वीज केंद्रांवर येऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमुळे उत्पादन करताना विद्युत केंद्रांना मार्गदर्शक तत्वाची सिमारेषा ओलांडता येत नाही. परिणामत: उत्पादनाला त्याचाही फटका बसत आहे. वीज ही अत्यावश्यक गरज ठरली असली तरी त्याच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च लक्षात घेता अधिक तोटा सहन करून निव्वळ सेवा देण्यासाठी उत्पादन करण्याच्या मानसिकतेत सरकार नाही. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज केंद्रांना पाच मानके आखून दिली आहेत. त्यात वीज केंद्रांची उपलब्धता, ऑक्झिलरी कंझम्शन, ऑईल कंझम्शन, हिट रेट आणि कोळसा वहन यांचा समावेश आहे. या पाचही मानकांचे संतुलन राखत वीज उत्पादन करणे ही तारेवरची कसरत ठरत आहे. या मानकांनुसार उत्पादन झाले नाही तर वीज केंद्र आर्थिक तोट्यात जाते. परिणामत: हे संतुलन बिघडायला लागले की त्याचा परिणाम वीज उत्पादनावररही पडतो.
 
उत्पादनात चंद्रपूरचा वाटा मोठा
राज्यातील सातही महाऔष्णिक वीज केंद्रातून होणाºया वीज निर्मितीमध्ये चंद्रपूरच्या केंद्राचा वाटा मोठा असल्याचा दावा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने केला आहे. या सातही ठिकाणांहून होणारी वीज निर्मिती सध्यास्थितीत ३,२४० मेगावॅट असताना एकट्या चंद्रपूरच्या केंद्रातील उत्पादन १,३७३ मेगावॅट असल्याचे (१६ जुलै) आकड्यांवरुन दिसत आहे. असे असले तरी, चंद्रपूर केंद्रातील उत्पादन क्षमता अन्य केंद्रापेक्षा अधिक आहे, हे देखील त्यामागचे एक कारण आहे.
 
विद्युत केंद्र आणि संचांची स्थिती
 
वीज केंद्र    एकूण संच बंद संच सुरू संच
चंद्रपूर             ८           २         ६
परळी              ४            ४         ०
भुसावळ           ५            ५         ०
नाशिक            ३             २         १
खापरखेडा        ५             ४         १
पारस               २            ०         २
कोराडी             ४           ३          १
एकूण              ३१          १९         १२
 

Web Title: Half of the power generation in the state, due to the closure of several sets, created 3240 MW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.