१२वीचे हॉल तिकीट आजपासून; ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान लेखी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:29 AM2022-02-09T06:29:34+5:302022-02-09T06:35:15+5:30

राज्य मंडळातर्फे ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जातील.

Hall tickets for 12th standard students will be available online from today | १२वीचे हॉल तिकीट आजपासून; ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान लेखी परीक्षा

१२वीचे हॉल तिकीट आजपासून; ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान लेखी परीक्षा

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या बुधवारपासून (दि. ९) इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.   

राज्य मंडळातर्फे ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जातील. तत्पूर्वी श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होतील. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात परीक्षेची संधी उपलब्ध केली आहे. मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवारी दुपारी एकपासून हॉल तिकीट कॉलेज लॉगिनमधून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकिटाची प्रिंटआऊट काढावी. 

Web Title: Hall tickets for 12th standard students will be available online from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.