विलेपार्ल्यात खाद्यपदार्थांच्या ३८ अनधिकृत स्टॉल्सवर हातोडा
By admin | Published: July 6, 2016 01:49 PM2016-07-06T13:49:04+5:302016-07-06T13:49:38+5:30
विलेपार्ल्यात मुंगीभाई मार्केटमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात येत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - विलेपार्ल्यात मुंगीभाई मार्केटमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात येत आहे. नेहरु रोड, हनुमान रोड, सुभाष रोड, श्रध्दानंद रोड, व्ही.एस.खांडेकर रोड, मुंगीभाईरोड आणि एम.जी.रोडवरील पदपथ बळकावणा-या फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाईची मोहिम सुरु आहे.
खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडणा-या ३८ फेरीवाल्यांचे स्टॉल पाडण्यात आले आहेत. बांबू आणि लोखंडी सळयांच्या सहाय्याने प्लास्टिक शेड उभारणा-या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेमध्ये दोन लॉरी, एक डंपर आणि एका जेसीबीचा वापर करण्यात येत आहे.