नाल्यावरील ६० बांधकामांवर हातोडा

By Admin | Published: June 10, 2016 03:13 AM2016-06-10T03:13:25+5:302016-06-10T03:13:25+5:30

नाल्यावर असलेली बांधकामे पडून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी अशा बांधकामांवर महापालिकेने गेल्या आठवड्यापासून हातोडा टाकण्यास सुरुवात

Hammer on 60 construction works | नाल्यावरील ६० बांधकामांवर हातोडा

नाल्यावरील ६० बांधकामांवर हातोडा

googlenewsNext


ठाणे : नाल्यावर असलेली बांधकामे पडून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी अशा बांधकामांवर महापालिकेने गेल्या आठवड्यापासून हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६० बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे. उर्वरित ७६ पैकी सात ठिकाणी पालिकेची सार्वजनिक शौचालये आहेत; तर सम्राटनगरमध्ये नाल्यावर असलेल्या ४३ बांधकामधारकांनी कारवाईला विरोध केल्याने आता पालिकेच्या या कारवाईला काहीसा ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ‘आधी पुनर्वसन करा, मगच कारवाई करा,’ असा पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला आहे. या मागणीवर आयुक्त कोणता निर्णय घेणार, त्यावरच पुढील कारवाईची रूपरेषा ठरवली जाणार आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये १३६ पेक्षा अधिक बांधकामे नाल्यावर असून ती पावसाळ्यापूर्वी संपूर्णपणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच घेतला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेतदेखील या बांधकामांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, कारवाई केल्यास तेथील पुनर्वसनाची जबाबदारी पालिका घेणार नसल्याचे सूतोवाच पालिकेने केले होते आणि त्यांना पालिकेने नोटिसादेखील बजावल्या आहेत. प्रतिनिधी)

Web Title: Hammer on 60 construction works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.