माणगावमधील अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 03:26 AM2017-01-19T03:26:53+5:302017-01-19T03:26:53+5:30
मुंबई-गोवा मार्गावर माणगाव हद्दीत असणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम बुधवारी १८ जानेवारीला राबविण्यात आली
माणगाव : मुंबई-गोवा मार्गावर माणगाव हद्दीत असणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम बुधवारी १८ जानेवारीला राबविण्यात आली. अनेक टपरीधारक आणि छोट्या व्यावसायिकांनी नोटीस बजावल्यानंतर स्वत:च अतिक्रमण काढल्याने कारवाई करण्याची वेळ आली नाही. मात्र कारवाईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१८ जानेवारीला सकाळीच ७ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेण कार्यालयाचे उपअभियंता गायकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. रस्त्यांच्या दुतर्फा असणारे अतिक्र मण हटवण्यात आले. यामध्ये दुकानांवर लावलेले बोर्ड, हातगाड्या, बॅनर, छोट्या टपऱ्या तोडण्यात आल्या.
राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेणकडून १० जानेवारीला सुमारे ८० नोटिसा देण्यात आल्या होत्या. या नोटिसा देऊन चार दिवसात अतिक्र मण हटविण्याची सूचना के ली होती. तसेच रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मीटरपर्यंत अतिक्र मण हटवण्यास नोटीसमध्ये सांगितले होते. राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेण यांनी महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही कारवाई केली. पेण कार्यालयातून नोटीस आल्यानंतर माणगावमधील बऱ्याच जणांनी आपणहून केलेली अतिक्रमणे हटवली. या मोहिमेत सहभागी होऊन बांधकाम विभागास सहकार्य केले. यामुळे मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)
>नगरपंचायतीने लक्ष ठेवावे
माणगावमध्ये केलेले अतिक्र मण तोडण्यासाठी नोटीस काही दिवस आधी दिली होती. त्याप्रमाणे आम्ही अतिक्र मणविरोधात ही कारवाई केली, तसेच सध्या रस्ता सुरक्षा अभियान पंधरवडा सुरू आहे. आता परत
अतिक्र मण होऊ नये म्हणून माणगाव नगरपंचायतीने लक्ष ठेवावे.
- पी.पी. गायकवाड, उप अभियंता
राष्ट्रीय महामार्ग उप विभाग पेण यांनी माणगाव महामार्गावरील अतिक्र मण काढणार आहोत आम्हाला पोलीस संरक्षण हवे असल्याचे सांगितले. म्हणून आम्ही सर्व पोलीस कर्मचारी फोर्स घेऊन या मोहिमेत सहभागी होतो. या वेळी सर्व माणगावकरांनी कोणताही अनुचित प्रकार न करता मोहिमेस सहकार्य दाखवले.
-ए.बी.लेंगरे, पोलीस निरीक्षक, माणगाव