मैदानांची देखरेख ठेकेदारांच्या हाती
By admin | Published: April 28, 2016 06:08 AM2016-04-28T06:08:26+5:302016-04-28T06:08:26+5:30
खासगी संस्थांना दिलेली ७६ मनोरंजन व खेळाची मैदाने पालिका प्रशासनाने आतापर्यंत ताब्यात घेतली
मुंबई : देखभालीसाठी खासगी संस्थांना दिलेली ७६ मनोरंजन व खेळाची मैदाने पालिका प्रशासनाने आतापर्यंत ताब्यात घेतली असून आता उर्वरित १७० मैदानेही ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थांना नोटीस पाठविण्यात येणार आहे़ या मैदानांच्या देखरेखीसाठी ठेकेदार नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़
मुंबईतील मनोरंजन व खेळाच्या मैदानासाठी नवीन धोरण पालिकेने तयार केले़ मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली़ तसेच खासगी संस्थांकडे असलेली मैदाने, क्लब, जिमखाना ताब्यात घेण्याची प्रक्रियाही त्यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७६ मैदाने ताब्यात घेण्यात आली आहेत़ मात्र नवीन धोरण लागू होईपर्यंत या मैदानांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होणार आहे़
आतापर्यंत ताब्यात आलेल्या ७६ मैदानांची देखभाल वॉर्डस्तरावरील कामगार करीत आहेत़ परंतु सर्व मैदानांची देखभाल अशा पद्धतीने ठेवणे अशक्य असल्याने पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे़ त्यानुसार ठेकेदारांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजूर होताच दोन दिवसांत इतर संस्थांना नोटीस पाठवून १७६ मैदाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीला दिली़ (प्रतिनिधी)
>मैदानांमध्ये काय असणार
च्ताब्यात घेतलेल्या मैदानांचा विकास केल्यानंतर त्यात हिरवळ, खुली व्यायामशाळा, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य असणार आहे़
च्मोकळ्या जागांच्या देखभालीबरोबर व्हॉलीबॉल, खोखो, कबड्डी, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, उंच उडी, गोळाफेक, रनिंग ट्रॅक आणि ओपन जिमसाठी लागणारे साहित्य अशा मैदान व उद्यानांमध्ये पुरविण्याचे ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले आहे़
>या मैदानांवरून सुरू होता वाद
च्मुंबई क्रिकेट असोसिएशन
च्बोरीवली येथील बिगर शासकीय संस्था सिटी स्पेस
च्विलेपार्ले येथील रमेश प्रभू यांचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल
च्राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मातोश्री सुप्रीमो क्लब
च्खा.गोपाळ शेट्टी यांचा
पोईसर जिमखाना
च्कमला विहार स्पोटर््स क्लब
च्वीर सावरकर उद्यान
च्झाँसी की रानी उद्यान
च्विनोद घोसाळकर यांच्या
संस्थेचे दहिसर स्पोटर््स फाउंडेशन
च्मंत्री सुभाष देसाई यांच्या
संस्थेचे गोरेगाव येथील प्रबोधऩ
>विरोधी पक्षांनी घेतली हरकत
ताब्यात घेतलेले भूखंड पुन्हा देखभालीसाठी ठेकेदारांकडे सोपविण्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आलेल्या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शविला़ या मैदानांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात़
मात्र प्रत्यक्षात मैदानांमध्ये पाणी, शौचालय याची सोय नाही, मनोरंजनाचे साहित्य नाही, अशी अवस्था असल्याने सार्वजनिक पैशाची नासाडी होत आहे, असा संताप विरोधकांनी व्यक्त केला़ मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपाने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला़