‘प्रत्येक न्यायालयात अपंगांसाठी सुविधा हव्यात’

By admin | Published: April 29, 2017 03:02 AM2017-04-29T03:02:25+5:302017-04-29T03:02:25+5:30

उच्च न्यायालयाची इमारत ‘ऐतिहासिक वारसा’ असली, तरीही हा दर्जा अपंगांना न्यायालयात ये-जा करण्याच्या आड येता कामा नये

'Handicapped facilities should be provided for every court' | ‘प्रत्येक न्यायालयात अपंगांसाठी सुविधा हव्यात’

‘प्रत्येक न्यायालयात अपंगांसाठी सुविधा हव्यात’

Next

मुंबई : उच्च न्यायालयाची इमारत ‘ऐतिहासिक वारसा’ असली, तरीही हा दर्जा अपंगांना न्यायालयात ये-जा करण्याच्या आड येता कामा नये, असे मत नोंदवत, प्रत्येक न्यायालयात त्यासाठी आवश्यक सुविधा असणे गरजेचे असल्याचे शुक्रवारी म्हटले.
हरीश शहा यांनी दाखल केलेल्या दाव्यातील प्रतिवादी जयाबेन ९६ वर्षांच्या आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांना चाकांच्या खुर्ची वापरावी लागते. कोर्ट खोली क्र. ३७ मध्ये चाकांची खुर्ची आणण्याची सुविधा नसल्याने त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी एका दिवस कोर्ट खोली क्र. ४६ मध्ये कामकाज चालवावे, अशी विनंती जयाबेन यांचे वकील फरहान दुबाश यांनी केली. न्या. पटेल यांनी त्यांची ही विनंती मान्य केली.
दरम्यान, या इमारतीचा ऐतिहासिक दर्जा अपंगाना न्यायालयात प्रवेश करण्याच्या आड यावा, हे स्वीकारार्ह नाही. न्याय मिळवण्याच्या व राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराशी हे विसंगत आहे. प्रत्येक कोर्ट खोलीत चाकांची खुर्ची नेण्याची सुविधा असावी,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी निबंधकांना हे प्रकरण समिती किंवा उपसमितीपुढे मांडण्याचे निर्देश
दिले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Handicapped facilities should be provided for every court'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.