पावसाळ्यात विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळा! महावितरणचे ग्राहकांना आवाहन

By admin | Published: June 7, 2017 07:05 PM2017-06-07T19:05:19+5:302017-06-07T19:06:16+5:30

मान्सूनला सुरुवात होताच वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत अपघात होतात.

Handle electrical equipment carefully during monsoon! Appeal to MSEDCL customers | पावसाळ्यात विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळा! महावितरणचे ग्राहकांना आवाहन

पावसाळ्यात विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळा! महावितरणचे ग्राहकांना आवाहन

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 7 - मान्सूनला सुरुवात होताच वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत अपघात होतात. असे संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसांत घराबाहेर असताना तसेच घरातही विजेबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
 
महावितरणने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वीज वाहक तार तुटून पडल्याचे नजरेस आल्यास तात्काळ जवळच्या महावितरणच्या कार्यालयास घटनेच्या पत्यासह कळवावे. त्यासाठी १९१२, १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. अशा तुटलेल्या तारांना हात लावू नये. त्या ओलांडू नयेत व इतरांनाही तसे करु देऊ नये. तसेच जनावरे, गुरेढोरे अशा तुटलेल्या तारेजवळ जावू देऊ नयेत. विद्युत वाहिनीजवळील झाडाच्या फांद्या तोडावयाच्या असल्यास महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देऊन लाईन बंद करून घेण्यात यावी. वीज वाहिनीच्या खांबास अथवा स्टेला जनावरे, गुरेढोरे बांधू नयेत. वीजवाहिनीखाली वा वाहिनीजवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये. तसेच झाडे लावू नयेत. कपडे वाळत घालण्याची तार वा वायर वीजवाहिनीच्या खांब अथवा स्टेला बांधू नये. वीजवाहिनीच्या खालून जाताना तसेच गॅलरीत किंवा गच्चीवर धातूची वस्तू हाताळताना तारेपासून वस्तू दूर व सुरक्षित अंतरावर राहील, याची काळजी घ्यावी. कोणत्याही कारणास्तव लाईनवर चढू नये. वीज वितरण यंत्रणेवर अथवा वीज सर्किटवर जादाचा भार टाकू नये. वीजवाहिनीच्या तारांवर हूक टाकून वीज वापरण्याचा प्रयत्न करू नये. वीजपुरवठयाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनधिकृत काम करण्याचा प्रयत्न करू नये. खाजगी वायरमनकडून फक्त घरातील वायरींचे काम करून घ्यावे. वीज वितरण यंत्रणेवरील कोणतेही काम खाजगी व्यक्तींमार्फत करून घेऊ नये. वीजवाहिनीच्या खांबाच्या तसेच स्टेच्या आर्थिंग वायर्स व स्टे वायर तोडू नयेत किंवा हाताळू नयेत. आपल्या विद्युत मांडणीचे अर्थिंग कार्यक्षम ठेवावे. तसेच मान्यताप्राप्त ठेकेदारांकडूनच कामे करुन घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. 
 
घरात वीज वापरताना घ्या ही खबरदारी-
 
घरातील विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करावा. मीटरच्या जागेत पाणी झिरपते का याची खातरजमा करावी. तसे आढळल्यास मीटरचा मुख्य स्विच तात्काळ बंद करावा. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तात्काळ मीटरची जागा बदलावी. पावसाळ्यातउबदार जागा म्हणून कोळी, किटक, पाल, झुरळ,‍ चिमण्या मीटरच्या खालील जागेचा आश्रय घेतात. यामुळेही शॉर्टसर्किट घडू शकते. उच्च दाब वीजपुरवठा आवश्यक असलेल्या मिक्सर, हीटर,‍ गिझर, एअरकंडिशनर, फ्रीज यासाठी थ्री-पिन सॉकेटचा वापर करावा. विद्युत उपकरणे दुरुस्त करताना मेन स्विच बंद करावा. पावसाळ्यात पायात रबरी चपला घालाव्यात. पायाखालची जमीन ओली नसल्याची खात्री करून घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्यात जोडू नये. 

Web Title: Handle electrical equipment carefully during monsoon! Appeal to MSEDCL customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.