जीवरक्षणासाठी सरसावले शेकडो हात

By admin | Published: August 24, 2014 01:19 AM2014-08-24T01:19:59+5:302014-08-24T01:19:59+5:30

एखादा अपघात झाला की पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी डोळे बंद करून निघून जायचे, प्रदूषणाचा विळखा वाढला तरी डोळेझाक करायची,

Hands for hundreds of hands to survive | जीवरक्षणासाठी सरसावले शेकडो हात

जीवरक्षणासाठी सरसावले शेकडो हात

Next
संजय वाघ - नाशिक 
एखादा अपघात झाला की पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी डोळे बंद करून निघून जायचे, प्रदूषणाचा विळखा वाढला तरी डोळेझाक करायची, दिवसाढवळ्या माय-भगिनींवर अत्याचार होत असताना मुकाटय़ाने पाहात राहायचे, व्यसनाच्या गर्तेत युवापिढी हरवत चालली असताना आपण काय करणार, अशी बेफिकीर वृत्ती एकीकडे वाढत असताना दुसरीकडे ‘आता हे थांबायलाच हवे,’ असे म्हणत जीवरक्षणासाठी शेकडो हात पुढे येतात, सामाजिक बांधिलकीशी नाते सांगू पाहतात ही गोष्ट हल्लीच्या काळात नक्कीच वाखाणण्याजोगी आणि आशादायी अशीच म्हणावी लागेल.
दिवसेंदिवस घडणारे वाढते अपघात, नशेच्या आहारी जात असलेली युवापिढी, पर्यावरणाचा होत असलेला :हास आणि धोक्यात आलेली नागरी सुरक्षा या चारही बाबी  व त्यामागील कारणांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर डॉ. बी. जी. शेखर नावाचा पोलीस खात्यातील एक अभ्यासू अधिकारी अस्वस्थ होतो. हे चित्र आपण पूर्णपणो बदलवू शकणार नाही, पण खारीचा वाटा निश्चितच उचलू शकतो या विचाराप्रत येतो. समाजातील विविध क्षेत्रंतील लोकांशी चर्चा करतो, मते जाणून घेतो आणि त्यानंतर जन्माला येते ‘लाइफ प्रोटेक्टर 1क्क्’ नावाची जिवाला जीव देणा:या लोकांची अराजकीय संघटना.
‘लाइफ प्रोटेक्टर 1क्क्’ या संघटनेचे कार्यक्षेत्र मुंबई, पुणो, नाशिक व नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र असे आहे. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणो, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मोटर अॅक्सिडेंट ट्रायब्युनलकडून मदत मिळवून देणो, शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणो, अपघातांची कारणो शोधून शासकीय-निमशासकीय संस्थांना उपाययोजनेसाठी प्रवृत्त करणो, राज्याचे रस्ता सुरक्षा धोरण आखण्यासाठी शासन व जनता यांच्यातील दुवा बनून मदत करणो आदी कामे ही संघटना करीत आह़े त्यासाठी व्यवस्थापकीय समिती, नियंत्रक समिती व कृती दल अशी त्रिस्तरीय कोअर कमिटी कार्यरत आहे. यासह विद्यार्थी व युवापिढी नशामुक्त करणो, ग्लोबल वॉर्मिग आणि सामाजिक सुरक्षा या चार मुख्य समस्यांवर संघटनेने लक्ष केंद्रित केले आहे.
दोन वर्षापूर्वीच या संघटनेने काम सुरू केले असून, मौखिक प्रचाराच्या बळावर नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून समाजसेवा करू इच्छिणारी शेकडो माणसे या चळवळीत स्वेच्छेने सहभागी होऊ लागली आहेत.
 
ड्रग्ज, नशेसंदर्भात प्रबोधन
सध्या तरुणपिढी मोठय़ा प्रमाणात सिगारेट, तंबाखू, व्हाइटनर, अमली पदार्थ व अन्य व्यसनांच्या आहारी गेली आहे. त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत चर्चासत्र, पॉवर पॉइंट प्रेङोंटेशन घेऊन विद्यार्थी तसेच पालकांचे प्रबोधन करणो.
 
वृक्षलागवड मार्गदर्शन
ग्लोबल वॉर्मिग व प्रदूषणामुळे होणारा जगाचा विध्वंस टाळण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धनाची चळवळ उभी करणो. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत वृक्षारोपण करणो, हवा, पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न, वाहनांचे ‘कुटुंब नियोजन’ करणो.
 
मनुष्याचे जीव वाचविण्यासारखे पुण्य इहलोकी दुसरे नाही. ते इतर कोणत्याही समाजसेवेतून मिळू शकत नाही. दु:खाने पीडित, अपघातग्रस्त प्रवासी व नागरिकांना मदत करण्यासाठी, वृक्षसंवर्धनासाठी तसेच शालेय विद्यार्थी व तरुणांना नशामुक्त करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून ही अराजकीय चळवळ सुरू केली आहे. समाजसेवा करू इच्छिणा:यांनी सुरक्षित विश्वासाठी या चळवळीत सहभागी होऊन लाइफ प्रोटेक्टर (जीवसंरक्षक) बनायला हवे.
- डॉ. बी. जी. शेखर, समन्वयक, लाइफ प्रोटेक्टर 
 
वारांगनांच्या 1क्6 मुलांना शैक्षणिक मदतीचा हात
मुंबईत वेश्या व्यवसाय करणा:या महिलांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहू नयेत, यासाठी संघटनेने आतार्पयत वारांगनांच्या 1क्6 मुलांना वेगवेगळ्या माध्यमांतून शैक्षणिक मदत मिळवून दिली आहे. मुंबईतील दानशूर व्यक्ती शोधून त्यांना प्रत्येकी चार-पाच मुले शैक्षणिक दत्तक घ्यायला सांगून त्यांच्या शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी सोपविली आहे. मुंबईतील वारांगनांच्या एक हजार मुलांना शिकविण्याचा व त्यांना नोकरी लावून स्वावलंबी बनविण्याचा लाइफ प्रोटेक्टर संघटनेचा संकल्प असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

 

Web Title: Hands for hundreds of hands to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.