दोषीला फाशी द्या; सरकार पक्षाची मागणी

By admin | Published: October 29, 2015 12:52 AM2015-10-29T00:52:43+5:302015-10-29T00:52:43+5:30

सॉफ्टवेअर इंजिनीयर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी ३९ वर्षीय ड्रायव्हरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राज्य सरकारने विशेष महिला न्यायालयापुढे बुधवारी केली

Hang the culprit; Government party demand | दोषीला फाशी द्या; सरकार पक्षाची मागणी

दोषीला फाशी द्या; सरकार पक्षाची मागणी

Next

मुंबई: सॉफ्टवेअर इंजिनीयर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी ३९ वर्षीय ड्रायव्हरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राज्य सरकारने विशेष महिला न्यायालयापुढे बुधवारी केली. विशेष महिला न्यायालयाने ३० आॅक्टोबरपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी सरकारी वकिलांनी ३४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी वकिलांनी ड्रायव्हर चंद्रभान सानप याच्यावरील आरोप सिद्ध केल्याने, विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी सानप याला मंगळवारी दोषी ठरवले. त्यावरून विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सानपला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष महिला न्यायालयाकडे केली. ‘सानप स्त्रीलंपट असून, त्याचा स्वभावच असा आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी,’ असे अ‍ॅड. ठाकरे यांनी म्हटले. त्यावर सानपच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सानपचे वय लक्षात घेता, त्याला कमीत कमी शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सानपच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. वृषाली जोशी यांनी ३० आॅक्टोबरला निकाल देऊ, असे म्हटले. गोरेगाव येथील टीसीएस कंपनीत काम करणारी २३ वर्षीय टेकी ५ जानेवारी रोजी गायब झाली. घरच्यांबरोबर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये गेलेली टेकी ५ जानेवारी रोजी पहाटे ४:५५ वाजता एलटीटी स्टेशनवर उतरली. मात्र, ती गोरेगावला पोहोचलीच नाही. तिचा अर्धा जळलेला मृतदेह कांजूरमार्ग येथील खारफुटीजवळ आढळला. १६ जानेवारी रोजी पोलिसांनी टेकीच्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप याला अटक
केली. (प्रतिनिधी)

Web Title: Hang the culprit; Government party demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.