नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाट ; दोन-तीन दिवस पुरेल एवढाचा साठा
By admin | Published: May 15, 2016 07:08 PM2016-05-15T19:08:40+5:302016-05-15T19:08:40+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते.
नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ येते. याही वर्षी हीच स्थिती आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या ठणठणाटामुळे सर्वच रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.
उपराजधानित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अडीचशेवर खासगी रूग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून, तेलंगाणा येथून रूग्णांचा ओढा नागपुरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळांतपणाच्या रूग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु सर्वच ठिकाणी जेम-तेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. विशेषत: ह्यनिगेटीव्हह्ण ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढ्या ह्यनिगेटीव्हह्ण ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत आहे. इतर ग्रुपमध्ये ह्यएबीह्ण, ह्यओह्ण व ह्यबीह्ण पॉझिटीव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे.
- रोज एक हजार रक्तपिशव्यांची मागणी
शहरात दिवसाकाठी साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असते. परंतु सध्याच्या दिवसात २००-३०० रक्तपिशव्यांचा पुरवठा होत आहे. रक्त दिलेल्या सर्वच रूग्ण रिप्लेसमेंट रक्त देतील असे नाही. उन्हाळी सुट्या असल्याने अनेक रक्तदाते देखील बाहेरगावी जातात. या दिवसांत रक्तदान शिबिरे कमी झालेली असतात. उन्हाळ््यात रक्तदान केल्याने शरीराला नुकसान होईल किंवा बाहेर पडल्यावर लगेच चक्कर येईल अशा प्रकारचे गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास कचरतात. याचा फटका बसतो तो रक्तपेढ्यांना व रुग्णांना.