हंस अकेला उड गया

By Admin | Published: January 19, 2016 09:32 PM2016-01-19T21:32:29+5:302016-01-20T10:57:22+5:30

एखादी व्यक्ती आपली विद्वत्ता सहजतेने पेलते, कोणतेही अवडंबर न माजवता. तसे विलासराव मुख्यमंत्रिपद अथवा मंत्रिपद लीलया पेलताना दिसत.

Hans flew alone | हंस अकेला उड गया

हंस अकेला उड गया

googlenewsNext

२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.

विलासराव देशमुखांवर टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत १९ ऑगस्ट २०१२ मध्ये लिहिलेला खालील लेख.

हंस अकेला उड गया

एखादी व्यक्ती आपली विद्वत्ता सहजतेने पेलते, कोणतेही अवडंबर न माजवता. तसे विलासराव मुख्यमंत्रिपद अथवा मंत्रिपद लीलया पेलताना दिसत. आपल्यावरील राजकीय जबाबदारीचे दडपण येऊ न विलासराव क धी वाक ले नाहीत. हा त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि प्रशासनिक क ौशल्याचा पुरावा होता. त्यांच्यात आमच्या पिढीला आमचा नेता दिसत होता, यात शंका नाही. रु बाबदार पेहराव- खरे म्हणायचे तर छानछोकीची आवड, प्रसन्न, हजरजबाबी व्यक्ति मत्त्व, चालण्या-बोलण्यातील ऐट, सत्ता उपभोगण्यासाठीच जन्माला आलो आहोत, असा चेह:यावर भाव, दिलदारपणा, आश्वासकता आणि सकारात्मक दृष्टिकोन या आणि अशा गुणांच्या बळावर विलासराव ‘राजे’ वाटत. ‘देशमुखी’ त्यांच्या रक्त ात भिनली होती. आपण, आपला कु टुंब-क बिला याच्यात ते मश्गुल असत. मैत्रीला जागणो म्हणजे काय हे विलासरावांकडून शिकावे. कृतज्ञता हा त्यांचा मित्र सांभाळण्याचा मंत्र होता. एकदा मदत केलेल्याने पुढे कितीही त्रeस दिला तरी तो सहन क रावयाचा, या त्यांच्या बाण्याने त्यांचे
स्वत:चे कि त्येक दा राजकीय नुक सानच झाले; पण त्याबद्दल त्यांनी कधी तक्रारीचा सूर लावला नाही. त्यांना कु णी हिरमुसलेले पाहिलेही नसेल.  एकदाच ते उदासीनतेचे शिकार झालेले मी पाहिले. निवडणुकीत हरण्यापेक्षा लातूरकरांनी अव्हेरले याचे
त्यांना अपरिमित दु:ख झाले होते. त्यानंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वत:लाच मनापासून न पटलेल्या तडजोडी त्यांनी के ल्या, तरीही नशिबाने दगा दिला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. ‘क चरा झालाय आपला’ असे ते उद्विग्नतेने फोनवर म्हणाले. ‘काही काळ थांबा, दिवस पालटतील’ असा मी धीर दिला. आमच्या स्नेहसंबंधाला राजकीय नेता आणि वृत्तपत्रचा संपादक या नात्यापेक्षा अधिक ची एक कि नार होती. दोघांचा वयोगट एक . ते वर्ष- दोन वर्षानी लहान. ते लातूरचे, मी जवळच्या सोलापूरचा. भावानुबंध तशाच आवडी-निवडी सारख्या. कु णाच्याअध्यात-मध्यात सहसा न पडण्याचा दोघांचाही
स्वभाव. मित्र-मंडळीही समान. त्यामुळे राजकारणाव्यतिरिक्त गप्पा-टप्पांचे, टिंगल-टवालीचे विषयही सारखे. 
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्र मण विलासरावच थोपवून धरू शक तील, असा विश्वास श्रेष्ठींना वाटला आणि दीड दशके विविध खात्यांच्या मंत्रिपदाचा अनुभव घेऊ नही मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिलेले आणि पक्षाने उमेदवारी न दिल्याने
पक्ष- नेतृत्वाविरु द्ध बंड क रू न उठलेले विलासराव मुख्यमंत्री झाले. त्याच संध्याकाळी फोन क रू न ‘तुमच्या एका वाक्याच्या आधारावर होतो. दिवस बदलले हे सांगण्यासाठीच फोन के ला आहे. नंतर भेटूच.’ असे आठवणीने सांगायला ते विसरले नाहीत.
विलासराव आधुनिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शोभले. क्लिंटन मुंबईला आले असताना त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुसरा कोणता मंत्री शोभला असता. क्लिंटन यांची मुंबई-भेट हा विलासरावांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असावा.
क लावंतांच्या सहवासात त्यांना खरा आनंद मिळायचा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी सांस्कृ तिक कार्यक्रमांनाच हजेरी लावत आहे, हास्य-विनोदात वेळ दवडतो आहे, याचा काय मेसेज जनतेला जातोय, असे एक दा विचारले,
तेव्हा आजूबाजूला कोणी नाही असे पाहून ते म्हणाले,एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीने घेतल्यावर मुख्यमंत्र्यासाठी कामच उरलेले नाही!
एखादे वाक्य कि ंवा विनोद आवडला की भुवया उंचावून डोळे मोठे क रू न दाद द्यायची त्यांची पद्धत विलोभनीय वाटे, शिवाय त्या विनोदावर व कि श्श्यावर प्रती-भाष्य क रू न नवा विनोद त्यांना क रता आला तर खूश होऊ न टाळी मागण्यासाठी हात पुढे क रायची त्यांना सवय होती. उल्हास पवार, रामदास फु टाणो आणि सुधीर गाडगीळ वगैरे समवेत असले म्हणजे त्यांची क ळी अशी खुलायची की विचारता सोय नाही. चाल्र्स मेरियन नावाच्या समाजशास्त्रज्ञाने सर्जनशील नेतृत्वाची लक्षणो सांगितली आहेत. सामाजिक संवेदनतरलता, व्यक्ति गत संपर्क - कु शलता, गटसंपर्क - कु शलता, गटबाजीच्या राजकारणातील प्रावीण्य, संभाषण-चातुर्य, नवीन राजकीय समीक रणो निर्माण क रण्याची, नवविचार प्रसृत क रण्याची तसेच नवीन योजना राबविण्याची
क्षमता आणि प्रचंड प्रमाणावर स्पर्धात्मक ता! हे निक ष विलासरावांच्या नेतृत्वाला लावले, तर विलासराव निश्चित पहिल्या वर्गात पास होतील. क दाचित मूळच्या भिडस्त स्वभावामुळे आणि कोणाला न दुखावण्याच्या सवयीमुळे त्यांचे एकंदर योगदान
त्यांच्या ख:या क्षमतेपेक्षा क मीच ठरले. राज्याच्या भल्यासाठी विलासराव आणखी कि तीतरी क रू शक ले असते; पण अप्रिय निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय क ठोरतेचा अभाव त्यांच्यात आहे, असेच चित्र दिसले. त्यांच्या उणिवांनी
त्यांच्या गुणांना झाकोळून टाक ले. त्यांच्या निर्णयांचा बोलबाला झाला नाही. शिवाय, आपण के लेल्या प्रत्येक लहान-मोठय़ा राजकीय कामाची वारंवार जाहिरात क रण्याचा असभ्यपणा त्यांच्यात नव्हता. प्रत्येक मुख्यमंत्र्याबरोबर सलगी क रणा:या एका उत्तर भारतीय नेत्याला दूर का ठेवत नाही, तो तुमची प्रतिमा डागाळण्यासाठीच उपयोगाचा आहे, असे म्हणताच, ‘काय क रायचे? माझ्या अगोदर गाडीत माझ्या शेजारी जाऊ न बसतो. त्याला खाली क से उतरवायचे?’ असे म्हणून आपल्या भिडस्त स्वभावाची ओळख त्यांनी क रू न दिल्याचे स्मरते. नेतृत्वासाठी हा अवगुणच मानता येईल. विलासरावांवर दोषारोपण खूप झाले. विश्वासार्हता गमावण्याच्या स्पर्धेत राजकीय नेते सर्वात पुढे आहेत. कु णीही कोठलाही आरोप क रावा, तो राजकीय नेत्याला चिक टतोच आणि मूळ आरोपात चविष्ट मसाला भरणो हा स्वतंत्र देशाच्या नागरिकांच्या निराशेचा उद्गार असतोच. पण आपण किंवा आपल्यापैकीच मंडळी नेत्यांक डे वा मुख्यमंत्र्याक डे जाऊ न कायदा वाक वायला कि ंवा मोडायची गळ
घालतात, हे मात्र सोयीस्क ररीत्या विसरले जाते. भलेभले आपल्या स्वार्थासाठी क शी, कोणती आणि कि ती गळ मंत्री-मुख्यमंत्र्यांना घालतात याचे ‘चक्षुर्वई सत्यम’ वर्णन पत्रकार एक मेकांक डे सतत क रतअसतात. भले भले लोक इतरांच्या भ्रष्टाचाराच्या क हाण्या सांगताना आपणही गुपचुपपणो त्याच मार्गाने गेलो हे सांगायचे टाळतात. आपले राजकारणी खूप
बरे आहेत, असेच म्हटले पाहिजे. ते अशी गुपिते क धी उघडी क रत नाहीत. ती त्यांनी उघडी के ली तर भल्या-भल्यांच्या भ्रष्टाचाराची कि त्येक नवी प्रक रणे उघडकीला येतील. विलासरावांसह अनेक मुख्यमंत्र्यांक डून त्यांच्या नरमाईचा लाभ घेत दहा
टक्क्यांच्या सवलतीत तीन-तीन घरे मिळवलेले दोषी नाहीत आणि त्यांच्या विनंत्यांना मान देऊ न, कायदा वाक वून अशी घरे देणारे विलासराव व अन्य मुख्यमंत्री मात्र दोषी, हा न्याय म्हणायचा? मंत्री-मुख्यमंत्री यांनी इतरांचा तसेच कार्यक त्र्याचा आर्थिक लाभ क रू न द्यावा आणि स्वत: मात्र क मळाच्या पानासारखे भ्रष्टाचारापासून दूर राहावे, ही आपली अपेक्षा असते.
परिणाम एक च. मंत्री-मुख्यमंत्र्यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटका नसते. विलासराव अपवाद ठरले नाहीत. विलासरावांना मुख्यमंत्री पदावरू न दोन वेळा पायउतार व्हावे लागले. दोन्ही वेळची कारणो तशी त्यांच्या एकंदर क र्तबगारीच्या तुलनेत क्षुल्लक ; पण जनमताच्या तथाक थित ‘नैतिक ‘ रेटय़ासमोर पक्षश्रेष्ठीं ना नमते घ्यावे लागले. सुशिक्षित आणि सामाजिक कळकळ असलेल्यांना एक ‘विके ट’ काढल्याचे समाधान मिळाले. सत्ता मिळते तशी जातेही, हे राजकीय नेत्यांना
ज्ञात असते. त्यामुळे त्यांची नशिबावर जास्त मदार असते. परमेश्वरावर श्रद्धा असते. संत-महंत यांच्या कच्छपी लागण्याची शक्यताही अधिक असते. एरवी आधुनिक , विवेक वादी, बुद्धिप्रामाण्यवादी वाटणारे विलासराव सत्य साईबाबांविषयी अतोनात हळवे होत, याचा अनुभव त्यांच्या जवळच्या मंडळींना होता. सरपंचापासून के ंद्रीय मंत्र्यार्पयत राजकीय प्रवास के लेल्या विलासरावांनी लोक शाही मूल्ये पक्की बाणवली होती. त्यांची मुख्यमंत्रिपदावरील राजकीय कारकीर्द एक ंदर दहा वर्षाची. वसंतराव नाईक यांच्या अक रा वर्षाच्या कारकीर्दीपेक्षा फ क्त एका वर्षाने क मी.  आपले काम क रत राहावे, इतरांचे इतरांना क रू द्यावे, हे त्यांचे धोरण. ही परमत सहिष्णुता लोक शाही मूल्ये आत्मसात के ल्याशिवाय येत नाही. दहा वर्षाहून अधिक काळाच्या माङया संपादकीय कारकीर्दीत त्यांनी ना कोणत्या वार्ताहराबद्दल तक्र ार के ली ना कोणत्या टीकात्मक संपादकीयाबद्दल वा लेखाबद्दल तक्र ार के ली. ‘आमच्यावर टीका क रणो हे त्यांचे व तुमचे कामच आहे’, असे ते हसून म्हणत. वास्तविक मुख्यमंत्री वा मंत्री यांचे पत्रकारांच्या- संपादकांच्या बाबत क धीही समाधानी नसतात. दोघांचे नाते पूर्वीइतके नसले तरी विळ्या-भोपळ्याचेच म्हणता येईल; पण विलासरावांनी क धीही असमाधान व्यक्त  के लेले स्मरत नाही. त्यांच्या मिस्कील स्वभावानुसार एखादी शेरेबाजी ते क रत एवढेच. त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक राहिला. अगदी एखाद्या मेळाव्यात कुणी वक्ता त्यांच्यावर आगपाखड क रू न गेला तरी विलासराव चलबिचल होत नसत. त्याच्यानंतर बोलताना त्याच्या वक्त व्याचा परामर्ष ‘ते बोलले ते बरोबरच आहे. त्यांची भावना समजून घेतली पाहिजे,’ असे म्हणत त्याची फि रकी घेत आणि त्याचे
काम होण्यामध्ये असणा:या अडचणी सांगत. गुदगुल्या क रत गुदमरू न टाक ण्याचे क सब विलासरावांना चांगलेच अवगत होते. बघता-बघता सभेचा नूर बदलवणारा आणि सभा हातात घेणारा दुसरा वक्ताकाँग्रेस पक्षाक डे आता उरला नाही. हसत-हसत
विरोधकांची भंबेरी उडवणारे आणि सभा जिंकू न देणारे ओघवते वक्तृत्व या एकाच गुणासाठी विलासरावांना निवडणुकीच्या वेळी आमंत्रणो फार यायची. पण बाजी उलटवण्याची ही क ला त्यांना परिश्रमपूर्वक शिकावी लागली. आमदार या नात्याने सभागृहात के लेल्या पहिल्या-वहिल्या भाषणाच्या प्रसंगी आपली क7शी त्रेधा उडाली होती, याची रसभरीत क हाणी ते नेहमी सांगत. 
कु णी त्यांची तोंड भरू न स्तुती क रायला लागला की, समोर कि ंवा शेजारी बसलेल्याक डे पाहत नजरेने खुणावत. विलासरावांच्या इतका प्रसन्न चेह:याचा राजकीय नेता महाराष्ट्र राज्याने क्वचितच पहिला. वागण्या-बोलण्यातील प्रसन्नता हा विलासरावांचा अनोखा गुण होता. या एका गुणाच्या बळावर त्यांना पहिल्या भेटीतच समोरची व्यक्त ी जिंक ली जाई. विलासराव देशमुखांच्या अनपेक्षित निधनामुळे एका उमद्या नेतृत्वाचा अचानक अंत झाल्याची भावना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष-नेत्यांची झाली. महाराष्ट्रात असे एक -दोनच नेते असतील ज्यांच्याबद्दल विरोधी पक्षीय नेतेसुद्धा हळहळ व्यक्त
क रतील. मोठय़ा प्रमाणावर निसर्गदत्त देणगी मिळालेल्या विलासरावांना सिनेमाचे विलक्षण आक र्षण होते. राजकीय नेत्याची चित्रपटांबद्दल आवड समजू शक तो आपण; पण विलासरावांचे चित्रपट-प्रेम अंमळ अधिक च होते. चित्रपटात काम क रण्याची त्यांची सुप्त इच्छा असावी, असे मला राहून-राहून वाटे. त्यांना एक दा म्हटलेदेखील की चित्रपटात गेला असतात तर फ ार तर चंद्रकांत वा सूर्यकांत यांच्या भूमिका मिळाल्या असत्या. त्यांनी फ क्त हसून दाद दिली. त्यांच्यावरचा विनोद ङोलण्याची ताक द त्यांच्याक डे होती, हा त्यांचा मोठाच गुण. कि ंबहुना स्वत:वर तसेच त्यांची पक्षाच्या कार्यक त्र्यावर विनोद क रू न दाद मिळवण्यास ते क मी क रत नसत. कपिल पाटील यांच्या ‘लोक मुद्रा प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘देशमुखी’ या भाषणसंग्रहाला मी प्रस्तावना लिहिली. प्रकाशनसोहळ्याच्या निमित्ताने अनेक भाषणो झाली, माङया भाषणात मी एक निवडणुकीचा कि स्सा सांगितला होता. एका गावात एका रस्त्याच्या कोप:याला बसून एक छोटा मुलगा रडत होता. नुक ताच निवडणूक जिंक लेला आमदार तिथून चालला होता. त्या रडणा:या मुलाला पाहून आमदार म्हणाला, ‘का रडतुयास रं बाबा?’ मुलगा म्हणाला, ‘माज्या बाची माज्यावरची पीरती क मी जालीय.’ आमदारांनी विचारले, ‘पन तुजा बा तर दोन वर्सापूर्वीच मेला नव्हं!’ मुलगा म्हणाला, ‘व्हय ना! पन विलेक्षनच्या वक्ताला मत द्यायला आलता म्हणत्यात, माला न भेटताच गेला. माज्यावरची पीरतीच क मी जालीय त्याची.’ या कि श्श्याचा धागा पक डून विलासरावांनी साखरकारखान्याच्या निवडणुकीचे जे कि स्से सांगितले होते, ते ऐक लेल्यांची पोटे के वळ स्मरणाने दुखतील. उमद्या, दिलदार व्यक्त ीचे असे पाठ फि रवून अनपेक्षितपणो जाणो हे नेहमीच काळजाचा ठोका चुक वणारे आणि क्लेशकारक असते.
 
ज्ञानावर कर कसा?
मुंबईच्या ‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’चे मालक टी. एन. शानभाग एके दिवशी म्हणाले की, पुणो आणि ठाणो
यांच्यासारख्या मोठय़ा शहरांनी पुस्तकांवर ऑक्ट्रॉय लावला तर त्याचा भरुदड आम्हाला वाचकांवर टाकावा
लागतो. आम्ही दोघे वेळ घेऊ न विलासरावांक डे वर्षा बंगल्यावर गेलो. मी म्हटले, युनेस्कोच्या ध्येयधोरणात
ज्ञानावर क र नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे, मग हा क र क सा? विलासरावांनी आमचे म्हणणो मान्य के ले,
पण ऑक्ट्रॉय हे प्रक रण राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, तरीही जी. आर. काढता येईल, असे
सांगितले. जी. आर. निघाला; पण त्यात ‘आवश्यक पुस्तकांवर क र नाही’ असे लिहिले होते आणि तोच
वादाचा मुद्दा होता. ‘आवश्यक पुस्तके ’ हे ठरविणार कोण? प्रत्येकाची ‘आवश्यक पुस्तकांची व्याख्या वेगळी
असू शक ते. कु णी म्हणोल धार्मिक पुस्तके आवश्यक , कु णी म्हणोल शालेय पुस्तके आवश्यक वगैरे. मग
पुन्हा आम्ही आपले विलासरावांक डे! ‘आमचे लोक म्हणजे..’ अशी त्यांनी सुरु वात के ली खरी, पण जास्त
काही न बोलता ‘कोणत्याही भाषेतील, कोणत्याही विषयाच्या भारतात व भारताबाहेर प्रसिद्ध झालेल्या
पुस्तकांवर ऑक्ट्रॉय क र नाही’ अशी दुरु स्ती जी. आर. मध्ये के ली. हा निर्णय भंडारा सार्वजनिक
ग्रंथालयाला त्यांनी भेट दिली, तेव्हा तेथे जाहीर के ला.
 

 

Web Title: Hans flew alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.