भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 02:28 PM2024-09-15T14:28:44+5:302024-09-15T14:30:09+5:30

नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ भाषण करत होते. तेवढ्यात जवळच असलेल्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. यामुळे भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला. यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेली हनुमान चालीसा बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला...

Hanuman Chalisa started during the speech Bhujbal said, everything is in the hands of Bajrangbali Lower the volume a bit in nashik | भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा!

भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा!


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ भाषण करत होते. तेवढ्यात जवळच असलेल्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. यामुळे भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला. यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेली हनुमान चालीसा बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला. 

नेमकं काय घडलं? -
मत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे एका कार्यक्रमात भाषण करत होते. ते काही स्थानिक रस्त्यासंदर्भात बोलत असतानाच जवळच्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. तेवढ्यात एक कार्यकर्ता भूजबळांना जोशात आणि अभिमानाने म्हणाला, 'बजरंगबलीसुद्धा धावून आले तुमच्यासाठी'. यावर भुजबळ खाली बघत उपरोधिकपणे हासरले अन् म्हणाले, 'बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...' यावर संबंधित कार्यकर्ता म्हणाला, 'नाही-नाही हनुमान चालीसा आहे ती, रोज लागते.' 

यावर भूजबळ म्हणाले, "थोडं शक्य झाल्यास आवाज कमी केला तर बरं होईल. आवाज कमी करा थेडावेळ... पोलिसांना माझं सांगणं आहे, एक दहा मिनिटे... बजरंगबलिला सांगा, बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली. जरा आवाज कमी करा, मीसुद्धा बजरंगबलीचा भक्त आहे बाबा. त्याच्याच आशीर्वादाने हे सर्व काम सुरू आहे." एवढेच नाही तर, "जरा पोलीस इस्पॅक्टरांनी ताबडतोब त्याची दखल घ्यावी... तिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतो...," असा आदेशही त्यांनी पोलिसांना दिला.

दरम्यान, आपले भाषण संपल्यानंतर भुजबळांनी हनुमान चालीसेचा आवाज कमी केल्याबद्दल मंदिर प्रशासनाचे आभारही मानले. "बजरंगबलीच्या मंदिरातील लोकांनी माझी विनंती ऐकली, मीत्यांचा आभारी आहे आणि तो परमेश्वर तुम्हा आम्हाला सर्वांना शक्ती, बुद्धी आणि युक्ती देवो," असे भुजबळ  म्हणाले. 

Web Title: Hanuman Chalisa started during the speech Bhujbal said, everything is in the hands of Bajrangbali Lower the volume a bit in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.